खरा निष्ठावंत कोण, हे पक्षप्रमुखांना माहिती आहे - संजय पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:37 IST2020-12-13T04:37:54+5:302020-12-13T04:37:54+5:30

कोल्हापूर : गेली तीस वर्षे शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन निष्ठेने काम केले आणि शेवटचा श्वास असेपर्यंत ते करीतच राहू. ...

The party chief knows who is the true loyalist - Sanjay Pawar | खरा निष्ठावंत कोण, हे पक्षप्रमुखांना माहिती आहे - संजय पवार

खरा निष्ठावंत कोण, हे पक्षप्रमुखांना माहिती आहे - संजय पवार

कोल्हापूर : गेली तीस वर्षे शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन निष्ठेने काम केले आणि शेवटचा श्वास असेपर्यंत ते करीतच राहू. माझ्या निष्ठेची मापे काढणाऱ्यांचे सामाजिक स्थान व मूल्ये काय आहेत? खरा निष्ठावंत कोण? हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व इतर नेत्यांना माहिती आहे, असा पलटवार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी पत्रकातून केला.

माझ्यावर आरोप करणारे ज्या पक्षात होते, त्या विचारसरणीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला, तीच मंडळी आमची निष्ठा तपासत आहेत. माझे सामाजिक, राजकीय स्थान काय आहे, हे कोल्हापूरच्या जनतेला माहिती आहे. सध्या महापालिका व ग्रामपंचायतीवर भगवा फडकविण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याने अशा टीकेला आम्ही फार महत्त्व देत नसल्याचे संजय पवार यांनी म्हटले आहे.

- राजाराम लोंढे

Web Title: The party chief knows who is the true loyalist - Sanjay Pawar