ट्रॅक्टर संचलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:25 IST2021-01-25T04:25:03+5:302021-01-25T04:25:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्राच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीत गेली दोन महिने आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा ...

ट्रॅक्टर संचलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : केंद्राच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीत गेली दोन महिने आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी (दि. २६) कोल्हापुरात ट्रॅक्टर संचलन करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने करण्यात आले आहे.
कृषी कायद्याविरोधात गेली दोन महिने दिल्लीच्या सीमांवर शेतकरी ठिय्या मारून बसलेले आहेत. आंदोलनाचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांनी प्रजासत्ताकदिनी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर मार्च काढण्याचे जाहीर केलेले आहे. त्याचप्रमाणे अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने कोल्हापूर शहरात मंगळवारी ट्रॅक्टर मार्च काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता दसरा चौकात शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ट्रॅक्टर मार्च ध्वजसंचलन करत शहरातून निघणार आहे. तरी यामध्ये शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर घेऊन या ट्रॅक्टर मार्च व ध्वजसंचलन कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन नामदेव गावडे, चंद्रकांत यादव, सतीशचंद्र कांबळे, वसंतराव पाटील, बाबूराव कदम, वाय. एन.पाटील, रवी जाधव, नामदेव पाटील, संदीप देसाई, रघुनाथ कांबळे, संभाजी जगदाळे, दिनकर सूर्यवंशी, दिलदार मुजावर, बाळू राऊ पाटील यांनी पत्रकातून केले आहे.