सभासदांना अद्यावत सुविधा देण्यास ‘पार्श्वनाथ’ कटिबध्द - गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:24 AM2021-09-19T04:24:02+5:302021-09-19T04:24:02+5:30

कोल्हापूर : पार्श्वनाथ बँकेच्या माध्यमातून बँकिंग क्षेत्रातील स्पर्धेला तोंड देत ग्राहकाभिमुख कारभार केला असून, आगामी काळात सभासदांना अद्ययावत सुविधा ...

'Parshwanath' is committed to provide up-to-date facilities to its members - Gandhi | सभासदांना अद्यावत सुविधा देण्यास ‘पार्श्वनाथ’ कटिबध्द - गांधी

सभासदांना अद्यावत सुविधा देण्यास ‘पार्श्वनाथ’ कटिबध्द - गांधी

Next

कोल्हापूर : पार्श्वनाथ बँकेच्या माध्यमातून बँकिंग क्षेत्रातील स्पर्धेला तोंड देत ग्राहकाभिमुख कारभार केला असून, आगामी काळात सभासदांना अद्ययावत सुविधा देण्यास संचालक मंडळ कटिबध्द असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अभय गांधी यांनी दिली.

पार्श्वनाथ को. ऑप. बँकेच्या २४ व्या वार्षिक सर्वसाधारण ऑनलाईन सभेत अध्यक्ष गांधी बोलत हाेते. ते म्हणाले, काेविड महामारीचा बँकिंग क्षेत्रावर परिणाम झाला आहे. बँकिंग क्षेत्रात माेठ्या प्रमाणात स्पर्धा असून, ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतात. बँकेने आपली गुणवत्ता टिकवून सभासदांच्या विश्वासाला पात्र राहून कामकाज केले आहे. बँकेचे गेल्या २४ वर्षांत निष्ठेने काम करून रौप्यमहोत्सवात पदार्पण केले. बँकेचे सरव्यवस्थापक जयसिंग पाटील यांनी स्वागत केले. मुख्य कार्यकारी अधिकारी तुळशीराम लटकन यांनी अहवाल वाचन केले. सभेस शिवाजीराव पाटील, डॉ. डी. ए. पाटील, सुरेश शहा, महादेव नलवडे, शशिकांत कुलकर्णी, सोनाली डेंब, तेजस्विनी शिरसाठ, जयंत देवकर, शरद केंगार आदी सभासदांनी चर्चेत भाग घेतला. बँकेचे संचालक विक्रमभाई शहा यांनी आभार मानले.

फोटो ओळी : पार्श्वनाथ बँकेच्या ऑनलाईन सभेत अध्यक्ष अभय गांधी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संचालक व अधिकारी उपस्थित होेते. (फोटो-१८०९२०२१-कोल- पार्श्वनाथ बँक)

Web Title: 'Parshwanath' is committed to provide up-to-date facilities to its members - Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.