शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: दुर्लक्षित पारगड आता राज्य संरक्षित स्मारकांच्या यादीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:07 IST

छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६७४ मध्ये गोव्यातील पोर्तुगीजांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पारगड किल्ला बांधला होता 

निंगाप्पा बोकडेचंदगड : तालुक्यातील किल्ले पारगडाला इतिहासाच्या पानांत मानाचे स्थान असून, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि स्वराज्याच्या सज्जतेची साक्ष देत उभा आहे. तो आता अधिकृतपणे राज्य संरक्षित स्मारक झाला आहे. राज्य शासनाने याबाबतची अंतिम अधिसूचना नुकतीच जाहीर केली. पारगडच्या संवर्धन आणि जतनाच्या दृष्टीने हा निर्णय ऐतिहासिक मानला जात असून, गेली कित्येक वर्षे दुर्लक्षित असलेल्या पारगडाला न्याय मिळवून देणारा ठरणार आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६७४ मध्ये गोव्यातील पोर्तुगीजांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पारगड किल्ला बांधला होता. त्याचे पहिले किल्लेदार म्हणून नरवीर तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा मालुसरे होते. इ.स. १६८९ मध्ये औरंगजेबाचा पुत्र शहाजादा मुअज्जम आणि खवासखान यांनी पारगडवर हल्ला केला. या भीषण युद्धात गडावरील तोफखान्याचे प्रमुख विठोजी धारातीर्थी पडले. विठोजी आणि त्यांच्या सती गेलेल्या धर्मपत्नी तुळसाबाई यांच्या समाध्या आजही पारगडावर शिवकालीन शौर्याची साक्ष देत उभ्या आहेत. त्यामुळे इतिहासाची साक्ष देणाऱ्या या किल्ल्याचे संवर्धन व जतन व्हावे, म्हणून महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्रविषयक स्थळे या विभागाकडे पाठपुरावा सुरू होता. त्यामुळे हा विभाग व अवशेष अधिनियम, १९६० (महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १२) अंतर्गत कलम ४ (१) नुसार राज्य शासनाने ३ सप्टेंबर २०२४ रोजी प्रारंभिक अधिसूचना काढली होती. त्यावर नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र, या कालावधीत कोणत्याही हरकत आली नाही. त्यामुळे शासनाने पारगड किल्ल्याला राज्यसंरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा अंतिम निर्णय घेतला.या निर्णयानुसार मौजे मिरवल (ता. चंदगड) येथील गट क्रमांक २१ मधील १९.४३ हेक्टर आर. क्षेत्रफळ असलेला पारगड किल्ला आता राज्य संरक्षित स्मारकांच्या अधिकृत यादीत समाविष्ट झाला आहे. यामुळे गडाच्या ऐतिहासिक वास्तू, अवशेष, तोफखाना व समाधी यांचे शासकीय पातळीवर संरक्षण व संवर्धन होणार असल्याने गडाला राज्यसंरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाल्याने इतिहासप्रेमी, शिवभक्त आणि पर्यटन क्षेत्रासाठी हा मोठा दिलासा मानला जात असून, भविष्यात गडाच्या संवर्धनासाठी शासनाकडून ठोस उपाययोजना राबवल्या जाण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

गडसंवर्धन मोहिमेला गती मिळणारतालुक्यात किल्ले पारगडसह गंधर्वगड, कलानंदीगड, महिपाळगड हे ऐतिहासिक किल्ले आहेत. त्यामुळे हा ऐतिहासिक ठेवा जतन करून ठेवणे आवश्यक असून हे ओळखून त्यासाठी गडसंवर्धन आराखडा तयार केला आहे. त्यात आता पारगड किल्ला राज्यसंरक्षित स्मारक म्हणून घोषित झाल्याने गडसंवर्धन मोहिमेला अधिक गती मिळणार असल्याचे आमदार शिवाजी पाटील यांनी सांगितले.विभागाने घेतली दखलतालुक्यातील ऐतिहासिक स्थळांचे जतन व्हावे म्हणून पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाकडे जून २०२२ मध्ये पाठपुरावा केला होता. त्याची दखल या विभागाने घेतल्याचे समाधान असून पारगडला राज्यसंरक्षित स्मारक करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे हा किल्ला विकासासाठी कामी येणार असल्याचे माजी आमदार राजेश पाटील यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Neglected Pargad Fort now in state-protected monuments list.

Web Summary : Pargad Fort, witnessing Shivaji Maharaj's valor, is now a state-protected monument. The decision aims to conserve the fort's historical structures, relics, and armory. This will boost conservation efforts and promote tourism, with expectations for government-led preservation initiatives.