शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

परशुराम आर्थिक विकास महामंडळ झालेच पाहीजे, बहुद्देशीय ब्राम्हण संघाची कोल्हापुरात निदर्शने

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: October 27, 2023 18:04 IST

कोल्हापूर : परशुराम आर्थिक विकास महामंडळ झालेच पाहीजे, जो ब्राम्हण हित की बात करेगा, वो कोल्हापूर पे राज करेगा, ...

कोल्हापूर : परशुराम आर्थिक विकास महामंडळ झालेच पाहीजे, जो ब्राम्हण हित की बात करेगा, वो कोल्हापूर पे राज करेगा, जय श्रीराम, मागणी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, श्री परशुराम जय जय परशुराम अशा घोषणा देत शुक्रवारी बहुद्देशीय ब्राम्हण संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने व एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.यानंतर शहराध्यक्ष केदार वाघापुरकर, सचिव अवधूत जोशी यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. यात गरिबी जात पाहून येत नसते हे जाणूनच शासनाने मराठा, ओबीसी, लिंगायत, गुरव अशा विविध समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळ जाहीर केले आहेत. संख्येने अत्यल्प असलेल्या ब्राम्हण समाजाला अन्य समाजाप्रमाणे आर्थिक समस्या भेडसावत आहे. गुणवता असूनही सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाल्याने गुणवंत, होतकरू तरुणांना व्यवसायाकडे वळावे लागत आहे. परंपरागत पौरोहित्यातून मिळणारे उत्पन्न अनिश्चित आहे. बँका कर्ज देत नाहीत. ब्राम्हण समाजाची मागणी विधानसभेत १० मार्चला लक्षवेधीमार्फत आमदार प्रकाश सोळंके यांनी मांडली. त्यावर सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन मिळाले मात्र कार्यवाही झालेली नाही हे निदर्शनास आणून देण्यात आले.यावेळी रघुनाथदादा शेतकरी संघटनेच्यावतीवने ॲड. माणिक शिंदे, अजय चौगुले यांनी संघाच्या मागणीला पाठिंबा दिला. यावेळी जयंत हरळीकर, प्रसाद कुलकर्णी, सचिन जनवाडकर, संजय जोशी, नंदकुमार मराठे, प्रसाद भिडे, बाबा वाघापूरकर, हर्षाक हरळीकर, गणेश देसाई, अजित ठाणेकर, संजय पोवार. राजेंद्र किंकर, उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbrahman mahasanghब्राह्मण महासंघ