शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सात वर्षांच्या सुप्रजाचे हजार फुटांवरून पॅरासेलिंग

By admin | Updated: September 3, 2015 22:12 IST

कऱ्हाड : वीस मिनिटांचा थरार; धाडसाबद्दल सर्व स्तरातून कौतुक

कऱ्हाड : ‘पॅरासेलिंग हा क्रीडा प्रकार खूप धाडसी आहे. नुसत्या कल्पनेनेच अनेकांच्या छातीत धडकी भरते; पण कऱ्हाडच्या बचपन स्कूलच्या सात वर्षांच्या सुप्रजा राहुल खडके या विद्यार्थिनीने एक हजार फूट उंचीवरून ‘पॅरासेलिंग’ करून वीस मिनिटांचा थरार अनुभवला. तिच्या या धाडसाबद्दल विविध स्थरांतून कौतुक होत आहे.कऱ्हाडमध्ये मर्चंट नेव्ही अधिकारी प्रशिक्षणाबाबत राहुल खडके यांची आर. के. मरिन करिअर अ‍ॅकॅडमी कार्यरत आहे. ते नेहमीच आपल्या कामानिमित्त गोवा, चेन्नई येथे नेव्हल शिप यार्ड, डॉकच्या भेटीसाठी जात असतात. त्यामुळे अनेकदा त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य त्यांच्याबरोबर प्रवासात राहतात. साहजीकच सुप्रजालाही लहानपणापासूनच हे बाळकडू मिळू लागले आहे.गोव्यातील कोळवा बिचवर असाच एकदा खडके परिवार लाईफ बोटीतून समुद्रात निघाला असताना समुद्राच्या मध्यभागी पॅरासेलिंग केले जात असताना सुप्रजाने पॅरासेलिंगसाठी आग्रह धरला. तेव्हा वॉटर स्पोर्टस् मॅनेजमेंटने याला परवानगी देत तिला लाईफजॅकेट व सेप्टी बेल्ट घालण्यात आला. आणि एक हजार फुटावरून तिने पॅरोसेलिंगचा अनुभव घेतला. सुमारे वीस मिनिटे ती आकाशामध्ये पक्ष्यांप्रमाणे विहार करत होती. तिच्या या धाडसाबद्दल अनेकांनी तिला बक्षीस देत तिचे कौतुक केले. (प्रतिनिधी)सुप्रजा खडकेचा सत्कार...४सुप्रजा खडकेने एक हजार फुटांवरून केलेले पॅरासेलिंग निश्चितच कौतुकास्पद आहे. तिच्या या साहसाची दखल भाजपनेही घेतली. कऱ्हाड येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात पक्षाच्या महिला आघाडीच्या राज्यसरचिटणीस उमा खापरे यांच्या हस्ते सुप्रजाचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील उपस्थित होते. गोवा येथे मरिन वॉटर स्पोर्टस् अ‍ॅडव्हॅचर क्लबच्या मार्गदर्शनाखाली सुप्रजाने एक हजार फूट उंचीवरून पॅरासेलिंग करून मलाही सुखद धक्का दिला आहे. मी मर्चंट नेव्ही व शिपिंग मॅनेजमेंटमध्ये काम करत आहे. माझी मुलगीही मोठी होऊन माझा वारसा चालवेल, असा मला विश्वास वाटतो.- राहुल खडके, पालकधाडसी प्रकार...पॅरासेलिंग हा एकदम धाडसी असा प्रकार आहे. पॅरासेलिंगचे नाव उच्चारले तरी अनेकांना धडकी भरते. त्यामुळे अनेकजण पॅरासेलिंग करण्याचे टाळतात. असे असतानाही सुप्रजा खडके हिने सुमारे एक हजार फुटांवरुन पॅरासेलिंग करुन धाडस दाखविले आहे. तिच्या या धाडसाचे कौतुक होत आहे.