शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

पानसरेंचे मारेकरी मोकाट का?

By admin | Updated: July 20, 2015 00:23 IST

दाभोलकर-पानसरे विचार मंचचा सवाल : निषेध फेरीत मुख्यमंत्र्यांचा धिक्कार

कोल्हापूर : शहीद दाभोलकर आणि पानसरे विचार मंचतर्फे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या निषेध फेरीमध्ये भाजप सरकार आणि पोलीस प्रशासनाचा तीव्र निषेध करण्यात आला़ यावेळी ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील मुर्दाबाद’ आदी घोषणा दिल्या़ रेखाचित्रे प्रसिद्ध करूनही मारेकऱ्यांना पकडण्यात अद्याप का अपयश येत आहे, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, अशी मागणीही करण्यात आली़ राजारामपुरीतील जनता बझार येथून सायंकाळी साडेसहा वाजता या निषेध फेरीला प्रारंभ झाला़ गोविंद पानसरे आणि डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रतिमांचे फलक हाती घेतलेले कार्यकर्ते या फेरीत सहभागी झाले़ ‘गोविंद पानसरे अमर रहे’, ‘पानसरे आणि दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे’, ‘आरएसएस मुर्दाबाद’, ‘मुख्यमंत्री मुर्दाबाद’, ‘पालकमंत्री मुर्दाबाद’ अशा घोषणा देत ही फेरी राजारामपुरी मुख्य रस्ता, मारुती मंदिर, नार्वेकर भाजी मंडई, प्रतिभानगर रोडमार्गे हुतात्मा स्मारक येथे सातच्या सुमारास पोहोचली़ मारेकऱ्यांच्या तपासात शासन व पोलिसांना आलेल्या अपयशाचा खरपूस समाचार यावेळी घेण्यात आला़ मेघा पानसरे म्हणाल्या, डॉ़ दाभोलकरांच्या हत्येला दोन वर्ष पूर्ण होत आली आहेत, पानसरें यांच्या हत्येला पाच महिने झाले असले, तरी त्यांच्या मारेकऱ्यांना पकडलेले नाही. मारेकऱ्यांचा तपास करण्याची शासनाची इच्छाच नसल्याचे दिसून येत आहे़ पोलिसांकडून तपासामध्ये प्रगती नाही़ त्यामुळे तपासाबाबतची आशा अंधुक होत आहे, पण तरीही आम्ही मागे हटणार नाही़ यावेळी मारेकऱ्यांचा लवकर तपास करावा, आमच्या संयमाला मर्यादा आहेत़ हा संयम सुटल्यास त्याची जबाबदारी पोलीस आणि शासनाची असेल, असा इशाराही देण्यात आला़ यावेळी ‘मुख्यमंत्री जवाब दो’, ‘दणा दणा दणा वणवा पेटला दणा दणा अन् या सरकारला हाणा ना’ अशा घोषणांनी हुतात्मा पार्क परिसर दणाणून गेला़ पानसरेंच्या मारेकऱ्यांना त्वरित पकडावे या मागणीचे निवेदन आज, सोमवारी जिल्हा पोलीसप्रमुखांना देणार असल्याचेही सांगण्यात आले़ या निषेध फेरीमध्ये दिलीप पोवार, अतुल दिघे, सुभाष जाधव, प्रा़ विलास रणसुभे, एम़ बी़ पडवळे, एस़ बी़ पाटील, बाबूराव कदम, आशा कुकडे, अरुण पाटील, प्रभाकर आरडे, बाळ पोतदार, रमेश वडणगेकर, सुभाष वाणी, सुजाता म्हेत्रे, रसिया पडळकर, उमेश पानसरे, गीता हासूरकर, कुमार दाभाडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)