शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पानसरे हत्येसंबंधी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 18:09 IST

नालासोपारा येथील स्फोटक प्रकरणात अटक केलेला शरद कळसकर याच्याकडून ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची दाट शक्यता आहे. कळसकरच्या कोल्हापूर वास्तवाची चौकशी सुरू असून एसआयटीची तीन पथके कर्नाटकसह पुणे आणि मुंबईला रवाना झाली आहेत. लवकरच महत्त्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देपानसरे हत्येसंबंधी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यतापथके कर्नाटकसह पुणे, मुंबईला रवाना

कोल्हापूर : नालासोपारा येथील स्फोटक प्रकरणात अटक केलेला शरद कळसकर याच्याकडून ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची दाट शक्यता आहे. कळसकरच्या कोल्हापूर वास्तवाची चौकशी सुरू असून एसआयटीची तीन पथके कर्नाटकसह पुणे आणि मुंबईला रवाना झाली आहेत. लवकरच महत्त्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.पानसरे हत्येच्या तपासासंबंधी सोमवारी सकाळी पोलीस महानिरीक्षक कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली; परंतु बैठकीची माहिती प्रसारमाध्यमांना देता येत नाही. गोपनीय आहे, असे सांगून अधिकाऱ्यांनी आपली बाजू झटकली.पानसरे हत्येचा तपास करणाऱ्या एसआयटी पथकाने आपले सर्व लक्ष संशयित शरद कळसकर याच्यावर केंद्रित केले आहे. एसआयटीचे प्रमुख संजीव सिंघल यांनी तपास अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देऊन पथके रवाना केली आहेत.

मुंबई एटीएसचे एक पथक कोल्हापुरातही तळ ठोकून असून त्यांचा संपूर्ण तपास गोपनीय आहे. ते संशयित कळसकर याची कुंडली गोळा करीत आहेत. त्याची येथील स्थानिक संघटनेशी काही संबंध आहेत का? याची माहिती काढण्याचे काम कोल्हापूर पोलिसांनी सुरू केले आहे.

बंगलोर एसआयटी, कोल्हापूर, पुणे आणि मुंबईचे एटीएस पथक एकमेकांच्या संपर्कात असून तपासासंबंधी ते एकमेकाला माहितीची देवाण-घेवाण करीत आहेत. या तपासावर काहीही बोलता येत नसल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी सांगितले.

त्या शस्त्रसंचलनाची चौकशीकोल्हापुरात काही महिन्यांपूर्वी एका हिंदुत्ववादी संघटनेने शस्त्र संचलन करीत मिरवणूक काढली होती. तलवारी, भाले, काठ्या, बंदुका, खंजीर अशी हत्यारे होती. ही मिरवणूक काढण्यामागचा उद्देश काय? हत्यार परवाने दिली कोणी? याची चौकशी करण्यासाठी एक विशेष पथक नियुक्त केले आहे; त्यामुळे या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडेही चौकशी होणार आहे.

संजीव सिंघल अनुभवी अधिकारीतत्कालीन एसआयटीचे प्रमुख संजीवकुमार यांची बदली झाल्याने त्यांचा पदभार संजीव सिंघल यांच्याकडे देण्यात आला आहे. सिंघल हे अनुभवी अधिकारी असून सर्व कौशल्य वापरून तपास करीत आहेत; त्यामुळे लवकरच कॉ. पानसरे हत्या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचण्याची आशा निर्माण झाली आहे. 

 

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस