पंकज पाटील यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:18 IST2021-01-08T05:18:07+5:302021-01-08T05:18:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोगनोळी : सन २०२३ मध्ये येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी तरुणांचे आशास्थान असणाऱ्या माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष ...

Pankaj Patil should get the candidature for the Vidhan Sabha | पंकज पाटील यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी

पंकज पाटील यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी

लोकमत न्यूज नेटवर्क कोगनोळी : सन २०२३ मध्ये येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी तरुणांचे आशास्थान असणाऱ्या माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी आग्रही मागणी निपाणी भाग काँग्रेस कार्यकर्त्यांमधून जोर धरत आहे. निपाणी मतदारसंघात गेल्या वीस वर्षांपासून त्यांनी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून ते लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हालसिद्धनाथ कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच भागातील विविध संस्था या सर्व निवडणुकीमध्ये एक युवा नेतृत्व म्हणून भूमिका पार पाडत असताना घवघवीत यश संपादन केले आहे. जिल्हा पंचायतीचे उपाध्यक्ष, तालुका पंचायतीचे अध्यक्ष व भूविकास बँकेचे अध्यक्ष या पदावर काम करत असताना सामान्य जनतेचे हित विचारात घेऊन सर्व योजना तळागाळांपर्यंत पोहोचविण्यामध्ये त्यांचा पुढाकार राहिला आहे. माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा राजकीय वारसा लाभलेल्या युवा नेतृत्वाचा येऊ घातलेल्या विधानसभेसाठी विचार व्हावा. त्यांनी आतापर्यंत पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या निर्णयाशी बांधील राहून काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते वाढविण्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी या सर्व गोष्टींचा विचार करून येऊ घातलेल्या विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने पंकज पाटील यांनाच उमेदवारी देतील, असा आशावाद काँग्रेस कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

Web Title: Pankaj Patil should get the candidature for the Vidhan Sabha