शिरोळमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:01 IST2020-12-05T05:01:08+5:302020-12-05T05:01:08+5:30
चाळीस हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या भरमसाट वाढत चालली आहे. ठिकठिकाणी ...

शिरोळमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत
चाळीस हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या भरमसाट वाढत चालली आहे. ठिकठिकाणी रस्त्यांवर आणि उघड्यावर टाकले जाणारे शिळे अन्न या कुत्र्यांना पूरक ठरत आहे. अर्जुनवाड मार्गावर व जयसिंगपूरकडून येणाऱ्या मार्गावर हॉटेलची संख्याही वाढली आहे. या परिसरात कुत्र्यांचा वावरही वाढला आहे. रात्रीच्या वेळी या मार्गावरून भटकी कुत्री रस्त्यामध्येच बसलेली असतात. त्यामुळे दुचाकीस्वारांना त्रास सहन करावा लागत आहे. कुत्र्यांना चुकविताना अनेकदा अपघात घडत आहेत. रेबीज कुत्र्याने पंधरा ते वीसजणांना चावा घेतल्याची घटना ताजीच आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने वेळीच उपाययोजना करण्याची मागणी शहरवासीयांतून होत आहे.