शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळा दुय्यम निबंधक कार्यालयातील पाचजणांना न्यायालयीन कोठडी ; गीता बोटे यांना तात्पुरता जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 18:15 IST

पन्हाळा दुय्यम निबंधक कार्यालयातील साडेतीन हजार रुपयांच्या लाचप्रकरणी पाचजणांना जिल्हा न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली; तर लिपिक संशयित गीता पांडुरंग बोटे यांना शनिवारपर्यंत तात्पुरता जामीन दिला. या सहाजणांना विशेष न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात गुरुवारी हजर करण्यात आले होते.

ठळक मुद्देपन्हाळा दुय्यम निबंधक कार्यालयातील पाचजणांना न्यायालयीन कोठडी गीता बोटे यांना तात्पुरता जामीन

कोल्हापूर : पन्हाळा दुय्यम निबंधक कार्यालयातील साडेतीन हजार रुपयांच्या लाचप्रकरणी पाचजणांना जिल्हा न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली; तर लिपिक संशयित गीता पांडुरंग बोटे यांना शनिवारपर्यंत तात्पुरता जामीन दिला. या सहाजणांना विशेष न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात गुरुवारी हजर करण्यात आले होते.पन्हाळ्याचे दुय्यम निबंधक संशयित यशवंत सदाशिव चव्हाण, शिपाई प्रकाश यशवंत सणगर, कॉम्प्युटर आॅपरेटर नितीन कोंडिबा काटकर, सुशांत दत्तात्रय वणिरे, खासगी उमेदवार शहाजी बळवंत पाटील आणि लिपिक गीता पांडुरंग बोटे या सहाजणांना लाचप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि. २८) पकडले होते. गुरुवारी या सर्वांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले.

संशयित आरोपींनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज सादर केला. या सहा आरोपींमध्ये महिला असल्याने व साक्षीदारांवर कोणताही दबाव आणू शकणार नाही; त्यामुळे गीता बोटे यांना न्यायालयाने शनिवारपर्यंत तात्पुरता जामीन दिला. अन्य आरोपींना न्यायालयीन कोठडीकरिता कारागृहात पाठविले. सर्वांच्या जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी होणार आहे.

या कामी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. समिउल्ला पाटील, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. अमित महाडेश्वर यांनी काम पाहिले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा