पन्हाळा पर्यटकांसाठी बंद मग राजकीय लोकांनाच प्रवेश का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 06:49 PM2021-07-10T18:49:42+5:302021-07-10T18:54:53+5:30

Panhala Tourist Kolhapur : पन्हाळा पर्यटकांसाठी बंद आहे, मात्र तालुक्यातून न्यायालयाच्या कामांसाठी येणाऱ्या पक्षकारांना ॲंटीजन तपासणी करून प्रवेश दिला जातो, आणि आता राजकीय लोकांना प्रवेश देण्यात येत आहे. यामुळे पन्हाळागडावरील व्यावसायिक संतप्त झाले असून सोमवारी प्रवासी नाक्यावरून कोणालाही न सोडण्याचा निर्णय घेतला असून आंदोलन करणार आहेत.

Panhala closed for tourists, then why only politicians? | पन्हाळा पर्यटकांसाठी बंद मग राजकीय लोकांनाच प्रवेश का ?

पन्हाळा पर्यटकांसाठी बंद मग राजकीय लोकांनाच प्रवेश का ?

googlenewsNext
ठळक मुद्देपर्यटनावर अवलंबून असणाऱ्या लोकांना हातभार लावण्याची मागणी पन्हाळा खुला करण्याची मागणी

पन्हाळा : पन्हाळा पर्यटकांसाठी बंद आहे, मात्र तालुक्यातून न्यायालयाच्या कामांसाठी येणाऱ्या पक्षकारांना ॲंटीजन तपासणी करून प्रवेश दिला जातो, आणि आता राजकीय लोकांना प्रवेश देण्यात येत आहे. यामुळे पन्हाळागडावरील व्यावसायिक संतप्त झाले असून सोमवारी प्रवासी नाक्यावरून कोणालाही न सोडण्याचा निर्णय घेतला असून आंदोलन करणार आहेत.

गेली काही वर्षे पन्हाळा पर्यटकांसाठी बंद आहे, त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या गरीब व्यावसाईंकाची कोंडी झाली आहे. आधी पावसामुळे रस्ता बंद झाला, त्यानन्तर सलग दोन वर्षे महापूर आणि त्यांनंतर दोन वर्षे कोरोनामुळे पन्हाळगड बंद आहे. मात्र तालुक्यातून न्यायालयाच्या कामांसाठी येणाऱ्या पक्षकारांना ॲंटीजन तपासणी करून प्रवेश दिला जातो, आणि आता राजकीय लोकांना प्रवेश देण्यात येत आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी सोमवारी पन्हाळ्यावर जिल्हापरिषद सदस्यांची मुलाखत घेतली जाणार आहे. यासाठी पालकमंत्री सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ पन्हाळ्यावर येणार आहेत.

यामुळे पन्हाळागडावरील व्यावसायिक संतप्त झाले असून सोमवारी प्रवासी नाक्यावरून कोणालाही न सोडण्याचा निर्णय घेतला असून आंदोलन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पन्हाळागडावरील नागरिकांत असंतोष पसरला आहे. यासाठी त्यांनी येथील प्रवासी कर नाक्यावर थांबून बाहेरच्या कुणालाही न सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

पन्हाळा सर्वांसाठी खुला करा नाहीतर सर्वांनाच बंद करा अशी आग्रही नागरिक करत आहेत. दरम्यान रविवारी येथे येणाऱ्या मंत्र्यांना येथील छोट्या व्यावसायिक तसेच ग्रामस्थामार्फत निवेदन देण्यात येणार असून पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या लोकांना हातभार लावण्याची तसेच पन्हाळा खुला करण्याची मागणी या निवेदनात करण्यात येणार आहे.

Web Title: Panhala closed for tourists, then why only politicians?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.