शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्री-वेडिंग फोटोग्राफीसाठी पन्हाळगडाला वाढतेय पसंती, ऐतिहासिक वेशभूषेला प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 12:35 IST

फोटोसेशन होत असता पुरातत्त्वचे कर्मचारी व फोटोग्राफर यांच्यामध्ये वाद

नितीन भगवान   पन्हाळा : पारंपरिक पद्धतीने विवाह करणे आता नव्या पिढीला रुचत नसल्याने काहीतरी हटके आणि वेगळे करण्याचे ठरते. यातील विवाहपूर्व (प्री-वेडिंग) ऐतिहासिक वेशभूषेत छायाचित्रणासाठी पन्हाळ्यावर गर्दी होऊ लागली आहे.कोण मावळ्याच्या भुमिकेत तर कोण राजांच्या भुमिकेत पहायला मिळत आहे. रुढी-परंपरेनुसार प्रत्येक धर्माची विवाह करण्याची पद्धती वेगळी असली तरी यात सर्वांत महत्त्वाचे ठरते ते छायाचित्रण, हेसुद्धा पारंपरिकच. नव्या पिढीला आपल्या होणाऱ्या जोडीदाराबरोबर बोलता यावे, ओळख व्हावी, स्वभाव कळावा या हेतूने विवाहपूर्वी एकमेकांना भेटता यावे यादृष्टीने नवा फंडा निर्माण झाला. याचा परिणाम म्हणजे लग्नापूर्वी छायाचित्रण केले जाते. मात्र यावेळी काहीतरी हटके करण्याच्या नादात छोटे-मोठे अपघाताची शक्यता असते. वादाचे प्रसंगपन्हाळ्यावर ऐतिहासिक इमारती भरपूर आहेत. या ठिकाणी पुरातत्त्व विभाग छायाचित्र अथवा छायाचित्रणासाठी कसलीही परवानगी देत नाही. या ठिकाणी हे प्री-वेडिंग फोटोसाठी गर्दी होते. विषेशत: तीन दरवाजा, अंधारबाव व नायकिणीचा सज्जा या ठिकाणी हे फोटोसेशन होत असता पुरातत्त्वचे कर्मचारी व फोटोग्राफर यांच्यामध्ये वाद होतात.पन्हाळा पोलिसांनी याविषयी लक्ष घालणे जरुरीचे आहे. ऐतिहासिक, पौराणिक व निसर्गाने नटलेल्या या पन्हाळ्यावर आता आणखीन एक नवी ओळख निर्माण होते आहे. प्री-वेडिंग फोटोसेशन पण यासाठी लागणाऱ्या परवानग्या अथवा त्याची नोंद असावी इतकीच माफक अपेक्षा आहे. परवानगी आवश्यकपन्हाळ्यावर छायाचित्रण करताना पुसाटी बुरुज, तानपीर परिसर हा भाग वनविभागाकडे आहे. याठिकाणी प्री-वेडिंगचे फोटो घ्यावयाचे असतील तर वन विभागाची परवानगी आवश्यक असल्याचे वनरक्षक व्ही. टी. दाते यांनी सांगितले.  

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFortगडmarriageलग्न