पंडेवाडीची रामलिंग यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:23 IST2021-04-19T04:23:06+5:302021-04-19T04:23:06+5:30

पंडेवाडी (ता. राधानगरी) येथे सालाबादप्रमाणे भरणारी ग्रामदैवत रामलिंग देवाची यात्रा यावर्षी रद्द करण्यात आली आहे. या ...

Pandewadi's Ramling Yatra canceled | पंडेवाडीची रामलिंग यात्रा रद्द

पंडेवाडीची रामलिंग यात्रा रद्द

पंडेवाडी (ता. राधानगरी) येथे सालाबादप्रमाणे भरणारी ग्रामदैवत रामलिंग देवाची यात्रा यावर्षी रद्द करण्यात आली आहे. या उत्सवासाठी पंचक्रोशीतील कोणीही येऊ नये, आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन यात्रा कमिटीने केले आहे. ही यात्रा बुधवारी, २१ एप्रिल रोजी होणार होती.

जिल्ह्यात कोरोनाचा वाढलेला कहर पाहता व जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार ही यात्रा रद्द करण्यात आली असून बाहेरगावाहून कोणीही माहेरवाशिणी, पै-पाहुणे, मित्रमंडळी यांनी येऊ नये. पाहुणे व मित्रमंडळी आल्यास कार्यवाहीस सामोरे जावे लागले. दवंडी देऊन कोणासही निमंत्रित न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही यात्रा गावातील मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

Web Title: Pandewadi's Ramling Yatra canceled