शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ, ८२ बंधारे पाण्याखाली; ‘राधानगरी’च्या विसर्गाने प्रशासन दक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 16:35 IST

सतर्कता म्हणून जिल्हा प्रशासनाने नागरिकांचे स्थलांतर सुरूच ठेवले आहे 

कोल्हापूर : शहरात आज दुपारपासून पावसाचा जोर कमी असला तरी जिल्ह्यात संततधार सुरुच आहे. धरणपाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाच्या स्वयंचलित दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे भोगावतीसह पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 40ʼ08'' फुटावर गेली आहे. तर ८२ बंधारे पाण्याखाली असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. सतर्कता म्हणून जिल्हा प्रशासनाने नागरिकांचे स्थलांतर सुरूच ठेवले आहे. आज, गुरुवारी हवामान विभागाने ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पुणे-साताऱ्यातील घाट परिसर, कोल्हापूरचा काही भाग, हिंगोली, यवतमाळ, परभणी आणि लगतच्या भागात येत्या ३, ४ तासात पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात काल, बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर एकदम कमी झाला. दिवसभर अधूनमधून सरी कोसळत होत्या, मात्र पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात एक इंचाने कमी झाली. आज सकाळपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने तसेच ‘राधानगरी’तून विसर्ग सुरु असल्याने नदी पाणीपातळीत पुन्हा वाढ झाली. यामुळे शहरासह परिसरातील नागरिकांची धाकधूक वाढली आहे. अचानक पाणी वाढले तर रात्रीच्या वेळी जायचे कोठे? म्हणून नागरिक सावध राहिले आहेत.चार तालुक्यांनी सरासरी ओलांडलीगेल्या वर्षी जून व जुलैमध्ये सरासरी ६२९ मिलीमीटर पाऊस झाला होता. जून कोरडा गेल्याने यंदा सरासरी गाठणार का? असे वाटत असतानाच गेल्या २० दिवसात जोरदार पाऊस कोसळला. आतापर्यंत जून व जुलैमध्ये सरासरी ६०२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.दृष्टिक्षेपात अलमट्टी धरण :पाण्याची आवक : प्रतिसेंकद १ लाख ३८ हजार ४७३ घनफूटजावक : १४ हजार ६९० घनफूटक्षमता : १२३ टीएमसीभरले : ६४ टीएमसीदृष्टिक्षेपात स्थलांतरित कुटुंबे :

एकूण निवारागृहे : ४७८ग्रामीण : ६५ कुटुंबातील ३१९ नागरिक व १२७ जनावरेमहापालिका : १५ कुटुंबातील ५१ नागरिकपडझडीत १६ लाखांचे नुकसानजिल्ह्यात ४४ खासगी मालमत्तांची पडझड झाली असून १६ लाख २ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

प्रमुख धरणातील साठा टक्के व कंसात विसर्ग प्रतिसेकंद घनफूट असा -राधानगरी : १०० (८५४०)वारणा : ८१ ( ९११)कासारी : ७९ (१०००)कडवी : ९० (१८०)कुंभी : ८१ (७००)घटप्रभा : १०० ( ३९९३)जांबरे : १०० (२०२०)कोदे : १०० (१२३१)

  • अलमट्टी विसर्ग : प्रतिसेकंद ७५ हजार घनफूट
  • पूरबाधित गावातील शाळांना सुट्टीच
  • गुरुवारसाठी ‘ऑरेंज’ अलर्ट
  • भोगावती नदीवरील बालिंगा पुलावरील वाहतूक पुन्हा सुरु
टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसradhanagari-acराधानगरीDamधरणriverनदी