शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा नदीचे पाणी फुटाने कमी; कोल्हापूर जिल्ह्यातील चौदा बंधारे खुले, वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 14:08 IST

अधूनमधून श्रावण सरी : राधानगरीचा विसर्गही झाला कमी

कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची उघडझाप राहिली. अधूनमधून जोरदार श्रावण सरी कोसळत राहिल्या, पण गेल्या आठ-दहा दिवसात पहिल्यांदाच पंचगंगेचे पाणी एक फुटाने कमी झाले. त्यामुळे दिवसभरात चौदा बंधारे पाण्याखालून मोकळे झाले आहेत. राधानगरीचा सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा दुपारी बंद झाल्याने विसर्ग कमी झाल्याने पुराची पातळी कमी होत आहे.गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ९.३ मिलिमीटर पाऊस झाला. धरणक्षेत्रातही तुलनेत पाऊस कमी असल्याने विसर्ग कमी झाला आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले होते, त्यातून प्रतिसेकंद ४३५६, तर वारणा धरणातून ११ हजार ५८० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र, दुपारनंतर राधानगरीचा एक दरवाजा कमी झाल्याने २८५६ घनफूट व वारणातून २९०५ घनफूट विसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे दिवसभरात पंचगंगा नदीची पातळी फुटाने कमी झाली आहे.

पाऊस कमी तरीही ४७ पडझडी

गेल्या चार दिवसांपासून पाऊस कमी झाला आहे, तरीही पडझड थांबण्याचे नाव घेत नाही. सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात ४७ मालमत्तांची पडझड होऊन १५ लाख २४ हजारांचे नुकसान झाले आहे.

एस. टी.ची चाके हळूहळू पूर्वपदावरपुराच्या पाण्याने एस. टी. महामंडळाचे मोठे नुकसान झाले आहे. सोमवारपासून एस. टी.ची चाके हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहेत. आता दहा मार्ग पूर्ण, तर तीन अंशता बंद आहेत. या मार्गावर पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसfloodपूर