पंचगंगा प्रश्नी ठोस कारवाई व्हावी : दिलीप देसाई यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:14 IST2021-01-08T05:14:05+5:302021-01-08T05:14:05+5:30
कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत बंद खोलीतील बैठका थांबवून प्रदूषणाविषयी सत्य जाणून घ्यावे व ठोस कारवाई करावी, अशी मागणी ...

पंचगंगा प्रश्नी ठोस कारवाई व्हावी : दिलीप देसाई यांची मागणी
कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत बंद खोलीतील बैठका थांबवून प्रदूषणाविषयी सत्य जाणून घ्यावे व ठोस कारवाई करावी, अशी मागणी प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्याच्या नावाखाली अनेक बैठका बंद खोलीत होतात, कागदी घोडे नाचवून अधिकारी काम केल्याचे दाखवतात व प्रदूषण करणाऱ्यांना पाठीशी घालतात. आजवरचे अधिकारी कर्तव्य बजावण्यात अक्षम ठरले असून, वीस वर्षे झाली तरी पंचगंगेचे प्रदूषण थांबलेले नाही. या बैठकांना जाणीवपूर्वकरीत्या आम्हाला बोलावले जात नाही. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने आपण बैठक घेणार असल्याचे वृत्त असून, ती केवळ फार्स ठरू नये व सत्य समोर यावे अशी आपली इच्छा असल्यास बैठकीचे निमंत्रण सत्य मांडणाऱ्यांनाही देण्यात यावे व प्रत्यक्ष कारवाई करण्यात यावी.
--