"पंचगंगा नदी पाणी पातळी कमी होण्याची शक्यता; नागरिकांनी घाबरु नये"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 02:04 PM2019-09-06T14:04:01+5:302019-09-06T14:24:15+5:30

धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने राधानगरी धरणाच्या ४ स्वयंचलित दरवाजे आणि वीजगृहातून ७ हजार ११२ क्युसेक विसर्ग सुरू आहे.

"Panchaganga River may decrease water level; citizens should not be panic" | "पंचगंगा नदी पाणी पातळी कमी होण्याची शक्यता; नागरिकांनी घाबरु नये"

"पंचगंगा नदी पाणी पातळी कमी होण्याची शक्यता; नागरिकांनी घाबरु नये"

Next

कोल्हापूर: राधानगरी धरणाच्या क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणाचे ४ स्वयंचलित दरवाजे आणि वीजगृहातून ७ हजार ११२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पाटबंधारे उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी केले आहे.
    

गेल्या ३ दिवसात जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथील पाणी पातळीत गेल्या ३ दिवसात १३ फूटांनी वाढ होऊन आज ती ३३ फूट इतकी आहे. सध्या पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे. तुळशीतून १ हजार ११, कुंभीतून १ हजार ८५० कासारीमधून १ हजार २५० असा  पंचगंगा नदीतून ११ हजार २२३ एवढा विसर्ग सुरू आहे. त्याचबरोबर राजाराम बंधाऱ्यातून ३३ हजार ३३२ क्युसेक एवढा विसर्ग चालू आहे. म्हणजेच मुक्त पाणलोट क्षेत्रातून २२ हजार १०९ क्युसेक एवढा विसर्ग सुरू आहे.
    

तसेच पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत कमी होण्याची शक्यता असल्याने कोणतीही गंभीर परिस्थिती उद्भवणार नाही. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. त्याचप्रमाणे नदी काठावरील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन देखील बांदिवडेकर यांनी केले आहे.

Web Title: "Panchaganga River may decrease water level; citizens should not be panic"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.