शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
4
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
5
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
6
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
7
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
8
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
9
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
11
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
12
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
13
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
14
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
15
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
19
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
20
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली

By admin | Updated: August 27, 2015 00:31 IST

बाजार समिती : घाऊक बाजारात किरकोळ विक्री; राजकीय वरदहस्त; व्यापाऱ्यांवर उपासमारी

राजाराम लोंढे - कोल्हापूर  बाजार समितीच्या घाऊक बाजारात किरकोळ विक्री करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले असताना, कोल्हापूर बाजार समितीत न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली केली जात आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही राजकीय वरदहस्तामुळे भाजीपाला व फळ मार्केटमध्ये राजरोसपणे किरकोळ विक्री सुरू आहे. परिणामी बाजार समितीनेच सुरू केलेला मिनी मार्केटमधील व्यवसाय पूर्णपणे संपला असून, तेथील व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. बाजार समितीने १९९३ ला गाळे बांधून भाजीपाला, फळे, कांदा-बटाट्याचे मिनी मार्केट तयार केले. या मार्केटमध्ये सुमारे शंभर गाळे आहेत. सुरुवातीच्या काळात एकेका व्यापाऱ्याचा दिवसाला तीन-चार हजार रुपये व्यवसाय व्हायचा; पण गेल्या पाच-सहा वर्षांपासून फळे व भाजीपाला मार्केटमध्येच किरकोळ विक्री सुरू केली आणि मिनी मार्केटमधील व्यवसायच संपला. घाऊक बाजारात माल घ्यायचा आणि तिथेच त्याची विक्री करण्याचे काम जवळपास शंभर व्यापारी करीत आहेत. याबाबत गेली चार वर्षे मिनी मार्केटमधील व्यापारी समितीकडे तक्रार करीत आहेत. समितीने केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने घाऊकमध्ये किरकोळ विक्री करण्याची संख्या वाढत आहे. परिणामी मिनी मार्केटमधील व्यवसाय संपला आहे. दिवसभर बसून शंभर रुपयांचाही व्यवसाय होत नसल्याने येथील व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. मध्यंतरी, पुणे बाजार समितीमध्ये घाऊक मार्केटमध्ये किरकोळ विक्री होत असल्याचा वाद न्यायालयात गेला होता. यासारख्या विविध ठिकाणांहून याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. पणन कायद्यानुसार हे बेकायदेशीर असून, तशी विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते; पण कोल्हापूर बाजार समितीमध्ये राजरोसपणे न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली सुरू आहे. याबाबत दोन दिवसांपूर्वी बाजार समितीतील मिनी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी समितीकडे तक्रार केली. त्यानुसार समितीने कारवाईच्या हालचाली सुरू केल्या; पण समितीच्या एका बड्या नेत्याच्या आदेशामुळे पुन्हा ही कारवाई बारगळल्याची चर्चा सुरू आहे.दाद मागायची कोणाकडे?या व्यापाऱ्यांचे हातावरचे पोट असल्याने आतापर्यंत पाच-सहा वर्षे त्यांनी अन्याय सहन केला. दिवसभर गिऱ्हाईकच नसल्याने त्यांना असाहाय्यपणे बसावे लागते. अनेक वेळा तक्रारी करूनही समितीला पाझर फुटत नाही. समितीने कारवाई करण्यास सुरुवात केली की, राजकीय मंडळी ती दाबून टाकतात. न्यायालयीन आदेशाचा उघड-उघड अवमान होत असताना कोणालाही त्याची पर्वा नाही. अवमान याचिका दाखल करण्याइतपत त्या व्यापाऱ्यांची ताकद नाही; मग त्यांनी दाद मागायची कोणाकडे? जिल्हा उपनिबंधकांनी समितीवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. घाऊक बाजारातील किरकोळ विक्रीबाबत आम्ही समितीला निवेदन देऊन थकलो आहे. आमचा व्यवसाय संपल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. न्यायालयाच्या आदेशाला ही मंडळी जुमानत नसतील तर आमच्यासारख्या गोरगरिबांचा आवाज ऐकणार कोण?- अकबर गोठेवाले (फळ विक्रेते, मिनी मार्केट) येत्या आठ-दहा दिवसांत सगळे व्यापारी मिनी मार्केटमध्येच जातील. घाऊक बाजारात कोणालाही विक्री करू देणार नाही. आम्हाला न्यायालयाच्या आदेशानुसार काम करावे लागेल.- विलास साठे (उपसभापती, बाजार समिती)