पाकिस्तानातील चौथाई भागावर कब्जा मिळेल; आप्पाचीवाडीच्या श्री हालसिध्दनाथ देवाच्या यात्रेतील भाकणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 19:05 IST2018-10-28T19:04:00+5:302018-10-28T19:05:09+5:30

दत्ता पाटील / म्हाकवे : मराठा सैनिक मृत्युला घाबरणार नाहीत. छातीची ढाल करून ते पाकिस्तानशी लढत राहतील पाकिस्तानचा चौथाई ...

Pakistan will get possession of fourth part; Prophecy of God's pilgrimage of Mr. Halisdhanath of Appachachiwadi | पाकिस्तानातील चौथाई भागावर कब्जा मिळेल; आप्पाचीवाडीच्या श्री हालसिध्दनाथ देवाच्या यात्रेतील भाकणूक

पाकिस्तानातील चौथाई भागावर कब्जा मिळेल; आप्पाचीवाडीच्या श्री हालसिध्दनाथ देवाच्या यात्रेतील भाकणूक

दत्ता पाटील / म्हाकवे : मराठा सैनिक मृत्युला घाबरणार नाहीत. छातीची ढाल करून ते पाकिस्तानशी लढत राहतील पाकिस्तानचा चौथाई कोना(भाग) ताब्यात घेतील. भुमाता दुभंगून जाईल. भुमातेतून भोंगे बाहेर पडतील.हे भोंगे मनुष्याच्या जीवनाला घातक ठरतील.जाती-धर्म बिघडत जाईल. त्यांच्यामध्ये वैरत्व वाढत जावून हाणामारी होईल अशी भविष्यवाणी श्री क्षेत्र आप्पाचीवाडी (ता.चिक्कोडी) येथिल श्री हालसिध्दनाथ देवाच्या यात्रेतील भाकणूकीमध्ये करण्यात आली.नाथांचे भक्त भगवान ढोणे-वाघापूरे यांनी ही भाकणूक कथन केली.
गुरुवारी येथिल भोंब यात्रेला प्रारंभ झाला. तर रविवारी पहाटेच्या निरव शांततेत नाथांची पहिली भाकणूक पार पडली. ही भाकणूक ऐकण्यासाठी आणि नाथउवाच कानावर पडण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविक उत्सुक असतात. हे हजारो भाविक आप्पाचीवाडी येथे दाखल झाले होते. महिला भाविकांची संख्याही उल्लेखणीय होती. दरम्यान, या यात्रेसाठी कागल,निपाणी, संकेश्वर, रायबाग, मुरगुड,चिक्कोडी येथून जादा बसगाड्यांची सोय करण्यात आली.

 

Web Title: Pakistan will get possession of fourth part; Prophecy of God's pilgrimage of Mr. Halisdhanath of Appachachiwadi