करवीर तालुक्यात गणेशमुर्तींचे रंगकाम अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:50 IST2021-09-02T04:50:48+5:302021-09-02T04:50:48+5:30
विविध प्रकारच्या गणेशमूर्तींना रंगकाम करण्यासाठी कुंभार व्यावसायिक मग्न झाले आहेत. यंदाही गणेशोत्सव सोहळ्यावर कोरोना महामारीचे सावट आहे. शासकीय निर्बंधांमुळे ...

करवीर तालुक्यात गणेशमुर्तींचे रंगकाम अंतिम टप्प्यात
विविध प्रकारच्या गणेशमूर्तींना रंगकाम करण्यासाठी कुंभार व्यावसायिक मग्न झाले आहेत.
यंदाही गणेशोत्सव सोहळ्यावर कोरोना महामारीचे सावट आहे. शासकीय निर्बंधांमुळे सार्वजनिक गणेशोत्सव सोहळ्यात चार फूट गणेशमूर्तींना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनी चार फुटी गणेश मूर्ती बसविण्यात येण्याचे नियोजन केले आहे. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर मात्र गणेशोत्सवावर मर्यादा आल्या आहेत. गणेश मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांना फाटा देत मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पाडायचे आहेत.
ग्रामीण भागात गणेशमूर्तींना रंगकाम करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले असले, तरी शासकीय नियमांचे ग्रामीण भागात कडक पालन करण्यात येणार आहे. कोरोना, अतिवृष्टी आणि महापूर यामुळे ग्रामीण जनतेत उत्साह दिसून येत नाही.