शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: इमारत रंगवताना तोल जाऊन दुसऱ्या मजल्यावरून पडला, उपचारदरम्यान पेंटरचा मृत्यू झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 12:31 IST

पोर्ले तर्फ ठाणे : मिरज येथील महाविद्यालयाची इमारत रंगवताना दुसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन पडलेल्या पेंटरचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला ...

पोर्ले तर्फ ठाणे : मिरज येथील महाविद्यालयाची इमारत रंगवताना दुसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन पडलेल्या पेंटरचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला प्रेमजीत दत्तात्रय मोळे (वय ३० रा.पोर्ले तर्फ ठाणे ता. पन्हाळा) असे मृत पेंटरचे नाव आहे.ही दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली.या घटनेची मिरज शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी,  प्रेमजीत मोळे हा गेल्या दहा वर्षापासून पेन्टिंगचे काम करत होता.चार दिवसापूर्वी गावातील मित्रांसोबत मिरजेतील बापूजी साळुंखे महाविद्यालयाची इमारत रंगविण्यासाठी आला होता. शुक्रवारी (दि.६) रोजी सकाळी दुसऱ्या मजल्यावर रंगकाम करीत असताना त्याचा तोल जाऊन जमीनीवर पडल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर तेथे काम करणाऱ्या प्रशांत वसंत कांबळे यांनी  त्याला उपचारासाठी मिरज येथील सिविल रुग्णालयात दाखल केले होते.दुपारी बाराच्या सुमारास उपचार सुरू असताना  प्रेमजीतचा मृत्यू झाला. घरची परिस्थिती हालाकी असल्यने प्रेमजीत पेन्टिंगचे काम करून कुटूंबाला मदत करत  होता. प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाच्या प्रेमजीतच्या अपघाती मृ्त्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात वडील, आई, आजी , भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू