शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून पेंटरला बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 11:33 IST

Crimenews Kolhapur : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून एका पेंटरला बेदम मारहाण करून गंभीर जखमी करण्याचा प्रकार घडला. ओंकार धोंडी खोचरे (वय २४, रा. छत्रपती कॉलनी, मुडशिंगी, ता. करवीर) असे जखमीचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि. १७) रात्री दौलतनगरात गोखले विद्यालयानजीक घडली.

ठळक मुद्देदारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून पेंटरला बेदम मारहाणदौलतनगरातील घटना : तरुणावर गुन्हा

कोल्हापूर : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून एका पेंटरला बेदम मारहाण करून गंभीर जखमी करण्याचा प्रकार घडला. ओंकार धोंडी खोचरे (वय २४, रा. छत्रपती कॉलनी, मुडशिंगी, ता. करवीर) असे जखमीचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि. १७) रात्री दौलतनगरात गोखले विद्यालयानजीक घडली.ओंकार खोचरे हे पेंटिंग काम करतात. रोज सकाळी दौलतनगर येथे एकत्र येऊन तेथून सर्व सहकारी एकोप्याने कामावर जात होते. शनिवारी सायंकाळी खोचरे हे कामावरून परतले. त्यानंतर ते मित्र सिद्धार्थ शेळके याच्यासह पायी शाहूनगरातील कामावर जात होते. त्यावेळी माउली पुतळा परिसरात त्याला संशयित सचिन संजय कोल्हे (२२, रा. दौलतनगर) याने अडवून दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्याने नकार देताच कोल्हे याने त्याच्या कानशिलात लगावली.

हातातील कडे त्याच्या डोक्यात मारून लाथाबुक्क्यांनीही बेदम मारहाण केली. हल्ल्यात खोचरे गंभीर जखमी झाले. सिद्धार्थ शेळके व अनिकेत मांगले या दोघांनी खोचरे याची त्याच्या तावडीतून सुटका केली. त्याला जखमी अवस्थेत सेवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात सचिन कोल्हे याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस