‘गणपती बाप्पा’चे चित्र रंगवा स्पर्धा

By Admin | Updated: September 5, 2014 00:25 IST2014-09-05T00:22:43+5:302014-09-05T00:25:57+5:30

लोकमत बालविकास मंच : सदस्यांना बक्षिसे जिंकण्याची संधी

Paint a picture of 'Ganapati Bappa' and contest it | ‘गणपती बाप्पा’चे चित्र रंगवा स्पर्धा

‘गणपती बाप्पा’चे चित्र रंगवा स्पर्धा

कोल्हापूर : लोकमत बालविकास मंच आणि कॅमलिन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गणपती बाप्पा’चे चित्र रंगवा स्पर्धा सुरू आहे. त्याअंतर्गत चित्र रंगवून बक्षिसे जिंकण्याची संधी बालमित्रांना उपलब्ध झाली आहे. यात पहिली ते दहावी या वयोगटांतील शालेय विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेत केवळ बालविकास मंचच्या सदस्यांना सहभागी होता येईल.
स्पर्धा गट-अ (इयत्ता पहिली ते दुसरी), गट -ब (तिसरी ते चौथी), गट- क ( पाचवी ते सहावी), गट-ड (सातवी ते आठवी) आणि गट-ई (नववी ते दहावी) मध्ये होत आहे. प्रत्येक गटासाठी स्वतंत्र बक्षिसे आहेत.
इचलकरंजी शहरासाठी स्वतंत्र दहा बक्षिसे दिली जातील. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या बालमित्रांनी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होणारे गणपती बाप्पाचे चित्र रंगवून दि. १० सप्टेंबरपर्यंत ‘लोकमत’च्या शहर कार्यालयात जमा करावयाचे आहे. ज्यांना रंगविण्यासाठी चित्र हवे त्यांना ते ‘लोकमत’च्या कार्यालयात मिळतील.
स्पर्धकांनी चित्रे रंगविण्यासाठी कॅमलिन कंपनीचे रंग वापरावेत. अधिक माहितीसाठी कोल्हापूर- नितीन (७७९८४७५५३०), इचलकरंजी -प्राची (९८९०९७८१०९) यांच्याशी संपर्क साधावा. (प्रतिनिधी)

सामान्यज्ञान स्पर्धेचे आज बक्षीस वितरण
लोकमत बालविकास मंच आणि चाटे स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कोल्हापूर ज्युनिअर एज्युकेशन आयडॉल सामान्यज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण उद्या, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात होणार आहे. या स्पर्धेतील ज्या विजेत्यांची नावे दि. २ सप्टेंबरच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाली आहेत, त्यांनी आपले बालविकास मंचचे ओळखपत्र आणि कोणतेही एक अन्य ओळखपत्र या कार्यक्रमास घेऊन येणे आवश्यक आहे.

Web Title: Paint a picture of 'Ganapati Bappa' and contest it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.