राज्यातील हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी मल्लांचे मानधन पुन्हा रखडले आहे. गेल्या आठ महिन्यांपासून त्यांना ते मिळालेले नाही. या मानधनाच्या प्रतिक्षेत त्यांची दिवाळी सरली. याबाबत चौकशी करणाऱ्या ज्येष्ठ मल्लांना केवळ ‘लवकर देऊ’ इतकीच ग्वाही दिली जात आहे. ...
शिवाजी पदभ्रमंतीतील सहभागामुळे आम्हाला एक अत्यंत दुर्मीळ ऐतिहासिक ठेवा पाहण्याचे भाग्य लाभले. कोल्हापुरी पद्धतीचे लज्जतदार जेवण खूप आवडले. हे दिवस आम्ही कधीच विसरू शकणार नाही, अशी भावना शिवाजी पदभ्रमंती सहभागी श्रीलंकन कॅडेटस्नी व्यक्त केली. ...
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून तापमानात घसरण झाली असून, किमान तापमान १८ डिग्रीपर्यंत खाली आले आहे. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले असून, बुधवारी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ...
संत साहित्याचे अभ्यासक आणि शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे माजी प्रमुख प्रा. ल. रा. तथा लक्ष्मण रामदास नसिराबादकर यांचे मंगळवारी सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांचे वय ८४ होते. त्यांच्या पश्चात पत्नी मंदाकिनी, मुलगा सुनिल, मुलगी सुनिता, सूना, ...