शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन, देवस्थान समितीचे सुरक्षा रक्षक, स्वयंसेवकासोबतच अत्याधुनिक ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर मंदिर परिसरावर असणार आह ...
राज्य शासनाने वेतन अमान्य केलेल्या नऊ अधिकाऱ्यांसह ३१ जणांना शिवाजी विद्यापीठाच्या फंडातून (निधी) वेतन दिले जात आहे. त्यांना १४ महिन्यांचे वेतन म्हणून वीस कोटी रुपये विद्यापीठ प्रशासनाने अदा केल्याची माहिती अधिकारातून उघड झाले आहे. ...
संशयित अर्चना व राजश्री यांचा परिचय होता. राजश्री एका इलेक्ट्रॉनिक दुकानात कामाला होत्या. तेथे ग्राहक म्हणून येणाऱ्या अर्चना हिच्याशी राजश्री यांची ओळख झाली. राजश्री यांना आजारातून बरे करण्यासाठी व अर्थप्राप्ती व्हावी, म्हणून हस्तरेषा बघून करणी झाल्य ...
भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून चेरापुंजीची ओळख आहे. मात्र ही ओळख यंदा महाबळेश्वरने पुसून टाकली आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे वातावरणात होणा-या बदलामुळे पाऊस कमी जास्त होत आहे. ...
आगामी हंगामात एफआरपी तीन टप्प्यांत देण्याचा घाट साखर कारखान्यांनी घातला असून, ते कदापि खपवून घेणार नसल्याचा इशारा शेतकरी संघटनांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना दिला. त्याचबरोबर मागील हंगामातील थकीत एफआरपी १५ टक्के व्याजासह देण्याची मागणीही त्यांनी ...
हळदकर घाणाशेजारी सिल्वर तरुण मंडळ फुलेवाडी चौथा बसस्टॉप येथील घरासमोर खडी पसरत असताना झालेल्या वादातून लोखंडी सळी डोक्यात घातल्याने गणेश जनार्दन सावंत (वय ४०) हे गंभीर जखमी झाले. ...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारूचा महापूर वाहण्याची दाट शक्यता आहे. छुप्या मार्गाने दारू आणण्यासाठी उमेदवारांच्या पंटरांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे; परंतु हा महापूर रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिर ...
कोगे (ता. करवीर) येथील मोरे मळा परिसरातील झाडावर चढून पुरात वाहून आलेले वाळलेले झाड बाहेर काढत असताना ते अंगावर पडून गंभीर जखमी झालेल्या राष्ट्रीय कुस्तीपटूचा सीपीआर रुग्णालयात उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला. विक्रम भगवान मोरे (वय २५) असे त्याचे ...