कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची उघडझाप राहिली. अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू असली तरी दुपारच्या टप्प्यात खडखडीत ऊन पडले होते. सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ६०.५० मिलिमीटरची नोंद झाली आहे. ...
शिक्षण विभागाच्या पूर्वीच्या सूचनेनुसार शिक्षक हे सोमवारी शाळांमध्ये आले. पण, शाळा बंद ठेवण्याबाबतचा माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश सकाळी साडेअकराच्या सुमारास प्राप्त झाल्याने माध्यमिक शिक्षक हे पुन्हा घरी गेले. ...
सोसाट्याचा वारा व पाऊस याची तमा न बाळगता खासगी ठेकेदार व विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यतत्परता दाखवून बारा दिवसात आपटाळ (ता . राधानगरी ) गावचा विद्युत पुरवठा पुर्ववत सुरू केला. ...
चंदूर (ता हातकणंगले) येथील शाहूनगर गल्ली नं 10 मधील एका चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिला विहिरीत टाकून खून केला. याप्रकरणी दोघा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना काल सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व ...
पुणे बंगळूर महामार्गावरीलून वाहतूक लॉकडाऊनचे अडीच महिने उलटले तरी ४० टक्केच वाहने धावताना दिसत आहेत.महामार्गावरून हळूहळू वाहनांची वर्दळ वाढताना दिसत आहे. ...
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून, खातेदार शेतकऱ्यासह त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीस लाभ होणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी दिली. ...