गार्डन क्लब स्पर्धेत विद्यापीठाच्या उद्यान विभागाला सर्वसाधारण विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 11:11 AM2021-01-01T11:11:39+5:302021-01-01T11:13:04+5:30

Agriculture Sector Kolhapur- कोल्हापूर येथील गार्डन क्लब आणि राजर्षी शाहू महाराज कृषी महाविद्यालयाने घेतलेल्या सुवर्णमहोत्सवी पुष्प प्रदर्शन व स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाचा उद्यान विभाग ४० गटांत सहभागी झाला. त्यापैकी ३० गटांत यश मिळविले. १२ गटांत प्रथम क्रमांक, १२ गटांत द्वितीय क्रमांक आणि ६ गटांत तृतीय क्रमांक पटकावून स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले.

The overall championship to the university's garden department in the Garden Club competition | गार्डन क्लब स्पर्धेत विद्यापीठाच्या उद्यान विभागाला सर्वसाधारण विजेतेपद

कोल्हापुरातील गार्डन क्लब आणि राजर्षी शाहू महाराज कृषी महाविद्यालयाने घेतलेल्या सुवर्णमहोत्सवी पुष्प प्रदर्शन व स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाचा उद्यान विभागाने ३० गटांत यश मिळविले. या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी अभिनंदन केले. यावेळी डावीकडून अभिजित जाधव, गणपती मस्ती, व्ही. एन. शिंदे, संभाजी कांबळे, संजय सोनुले, सुरेश वागवेकर, व्ही. टी. पाटील, जी. एस. कुलकर्णी उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देशहराच्या फुप्फुसाची देखभाल करणाऱ्या श्रमिकांचाच सन्मान कुलगुरू, प्र-कुलगुरूंकडून अभिनंदन

कोल्हापूर : येथील गार्डन क्लब आणि राजर्षी शाहू महाराज कृषी महाविद्यालयाने घेतलेल्या सुवर्णमहोत्सवी पुष्प प्रदर्शन व स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाचा उद्यान विभाग ४० गटांत सहभागी झाला. त्यापैकी ३० गटांत यश मिळविले. १२ गटांत प्रथम क्रमांक, १२ गटांत द्वितीय क्रमांक आणि ६ गटांत तृतीय क्रमांक पटकावून स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले.

या निमित्त उद्यान विभागाच्या सहकाऱ्यांचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी अभिनंदन केले. उद्यान विभागाला सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त होणे म्हणजे कोल्हापूर शहराच्या फुप्फुसाची देखभाल करणाऱ्या श्रमिकांचाच सन्मान आहे. या विभागाने पुढील पाच वर्षांचा आराखडा तयार करावा. विद्यापीठाचे उद्यान राज्यात सर्वोत्कृष्ट बनविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. शिर्के यांनी केले.

यावेळी उपकुलसचिव डॉ. जी. एस. कुलकर्णी, डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, अभियांत्रिकी विभागाचे मेस्त्री गणपती मस्ती, उद्यान विभागाचे अधीक्षक अभिजीत जाधव, हेडमाळी संभाजी कांबळे, संजय सोनुले, माळी सुरेश वागवेकर उपस्थित होते.

उद्यान विभागाने मिळविलेली पारितोषिके

क्लास-१: गुलाब (एकच फूल) पांढरा- प्रथम क्रमांक, फिका गुलाब- प्रथम व तृतीय, नारिंगी- द्वितीय व तृतीय, गडद पिवळा- प्रथम व द्वितीय, मिश्र रंग व इतर- प्रथम, क्लास-७ (फुले). डेलिया, मिनी डेलिया- प्रथम, झिनिया- द्वितीय, ॲस्टर, कर्दळ- तृतीय, शेवंती- द्वितीय व तृतीय, झेंडू व सालव्हिया, निशिगंध- प्रथम व द्वितिय, जास्वंद आणि इतर फुले, दुरंगी- द्वितिय, क्लास-९ (कुंड्यांतील रोपे), कोलीयस- प्रथम, बेगोनिया- तृतीय, इतर झाडे (फुलांशिवाय) आणि इतर झाडे (फुलांसह)- व्दितीय, औषधी व सुगंधी वनस्पती- द्वितिय व तृतीय.
 

Web Title: The overall championship to the university's garden department in the Garden Club competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.