शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील तीन हजारांवर गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर, निवडणुकीआधी होणार प्रतिबंधात्मक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 18:02 IST

याद्या तयार करण्याचे काम सुरू

कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची लगबग सुरू होताच पोलिसही ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जाणार आहेत. तसेच गंभीर गुन्ह्यांतील काही टोळ्यांवर हद्दपारीची कारवाई होणार आहे. यासाठी सराईत गुन्हेगारांच्या याद्या तयार करून कारवाईचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्याचे पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी सांगितले.निवडणुकांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काळात पोलिसांनी जिल्ह्यातील अडीच हजारांपेक्षा जास्त गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या होत्या. यात सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांसह यापूर्वी निवडणूक काळात गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींचाही समावेश होता. याशिवाय अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणारे विक्रेते, मटका आणि जुगाराचे अड्डे चालवणाऱ्या सराईतांचा समावेश होता. ही कारवाई आणखी व्यापक केली जाणार असून, गेल्या सहा महिन्यांत दाखल झालेल्या गुन्ह्यांतील व्यक्तींवरही प्रतिबंधात्मक कारवाई करणार असल्याचे पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी सांगितले.शस्त्रे जप्तीच्या सूचनाजिल्ह्यात विनापरवाना शस्त्रांची संख्या मोठी आहे. निवडणूक काळात याचा वापर होऊ शकतो. त्यामुळे निवडणुकीआधीच विनापरवाना शस्त्रे जप्त करावीत, अशा सूचना अधीक्षकांनी सर्व पोलिस ठाण्यांना दिल्या आहेत. विधानसभा निवडणूक काळातही पोलिसांनी शस्त्रांचा शोध घेऊन जप्तीची मोहीम राबवली होती.चुरशीच्या निवडणुकीमुळे विशेष खबरदारीराज्यासह स्थानिक पातळीवर राजकीय संदर्भ बदलले आहेत. आपलीच सत्ता यावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून पुरेपूर प्रयत्न होण्याची शक्यता आहे. यातून टोकाची ईर्षा आणि चुरस निर्माण होण्याचा धोका आहे. हीच बाब लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष खबरदारी घेणार असल्याचे अधीक्षक योगेश कुमार यांनी सांगितले.विधानसभा निवडणुकीत ६७५ जणांवर कारवाईविधानसभा निवडणुकीवेळी १५ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०२४ या काळात पोलिसांनी ६७५ जणांवर गुन्हे दाखल करून कारवाई केली होती. त्यात अवैध व्यावसायिकांसह अंमली पदार्थ तस्करांचा समावेश होता. अटकेतील आरोपींकडून २ कोटी १७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. यावेळीही तशा कारवाया केल्या जाणार असल्याचे अधीक्षकांनी स्पष्ट केले.