वर्षभरात १० लाख कर्मचारी, संस्थाचालक प्रशिक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:02 IST2018-11-14T00:01:50+5:302018-11-14T00:02:03+5:30
राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यातील पाच सहकार प्रशिक्षण केंद्राच्या वतीने वर्षभरात दहा लाख संस्थाचालक, कर्मचाऱ्यांना ...

वर्षभरात १० लाख कर्मचारी, संस्थाचालक प्रशिक्षित
राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्यातील पाच सहकार प्रशिक्षण केंद्राच्या वतीने वर्षभरात दहा लाख संस्थाचालक, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. राज्याच्या तुलनेत कोल्हापूर जिल्'ात सर्वाधिक पन्नास हजार जणांना प्रशिक्षित करण्याचे काम जिल्हा सहकारी बोर्ड व तात्यासाहेब मोहिते सहकार प्रशिक्षण केंद्राने केले आहे.
राज्य सरकारने २०१३ ला ९७ वी घटनादुरुस्ती केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सहकारी संस्थांच्या कायद्यात बदल करण्यात आला. सहकारी संस्थांना नवीन कायद्यात स्वायत्तता दिली असली तरी काही कायदे कठोरही करण्यात आले आहेत. त्याची माहिती संस्थांचे संचालक, अधिकारी, कर्मचारी व सभासदांना व्हावी, यासाठी त्यांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. राज्यात पाच प्रशिक्षण केंद्रे कार्यरत असून, त्यांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते.
घटनादुरुस्तीपूर्वी सहकारी संस्थांमधून प्रशिक्षण केंद्रांना काही निधी दिला जात होता. त्यातून या केंद्रांचे कार्य चालायचे; पण आता प्रशिक्षणार्थींच्या फीमधूनच केंद्रांचा गाडा चालवावा लागतो. धनाजीराव गाडगीळ प्रशिक्षण केंद्र- नागपूर, विठ्ठलराव विखे-पाटील- पुणे, ‘यशदा’- पुणे, ‘वैकुंठभाई मेहता’- पुणे, महाराष्टÑ राज्य सहकार संघ, पुणे ही केंद्रे कार्यरत आहेत.
गेल्या चार वर्षांपासून राज्यातील ५७ हजार ११३ सहकारी संस्थांच्या ३० लाख सभासद, संचालक व सेवकांना प्रशिक्षण दिले आहे. मागील दोन वर्षांत प्रशिक्षणाचे काम गतीने झाले आहे. गेल्या वर्षभरात १४ हजार ४३८ संस्थांच्या १० लाख सभासद, संचालक व कर्मचाºयांना प्रशिक्षण दिले आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्हा आघाडीवर असून, कोल्हापूर जिल्हा सहकार बोर्ड व तात्यासाहेब मोहिते सहकार प्रशिक्षण केंद्राच्या वतीने ५० हजार जणांना वर्षभरात प्रशिक्षित केले.
गेल्या चार वर्षांतील प्रशिक्षणाची आकडेवारी
आर्थिक वर्ष संस्था सभासद संस्था संचालक संस्था कर्मचारी
२०१४-१५ ९९७० २९४३७३ २३४ ५९७७ १२१४ ३१०७३
२०१५-१६ १४३२४ ७४६५२७ ७०८ १२३३३ १०९९ २९७५७
२०१६-१७ १३४१८ ९१५३२९ ७६९ १२१४९ ९३९ २५५४६
२०१७-१८ १२४२३ ९५१३२५ ७९८ १३०७८ १२१७ ३६०९१