शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
2
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
3
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
4
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
5
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
6
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
7
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
8
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
9
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
10
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
11
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
12
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
13
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
14
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
15
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
16
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
17
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
18
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
19
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
20
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 

आदिवासी कोळी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 5:00 PM

कोल्हापूर जिल्हा आदिवासी कोळी समाज विकास मंडळाच्यावतीने आपल्या विविध मागण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाआदिवासी कोळी समाज विकास मंडळ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा आदिवासी कोळी समाज विकास मंडळाच्यावतीने आपल्या विविध मागण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून संताप व्यक्त केला.  

‘हरहर महादेव, संवीधान आमच्या हक्काचे, एक कोळी-लाख कोळी’ अशा घोषणा देत आदिवासी महादेव कोळी, टोकरे कोळी, कोळी ढोर, कोळी मल्हार, डोंगर कोळी या समाजातील लहान मुलांसह महिला, युवती, पुरुष मोठ्या संख्येने न्यायमागण्यासाठी रस्त्यावर उतरले होते.  

बोगस आदिवासींच्या नावाखाली शासकिय नोकरीतील खऱ्या आदिवासी कर्मचाऱ्यांना पदमुक्त करण्यासाठी राज्य शासनाकडून सुरु असलेले षडयंत्र त्वरीत थांबवावे अशी मागणी या आक्रोश मोर्चाद्वारे करण्यात आली.मोर्चाला येथील टाऊन हॉल उद्यान परिसरातून प्रारंभ झाला. मोर्चा दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, असेंब्ली रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. मोर्चातील सहभागी सर्व आंदोलकांच्या डोक्यावर भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या, अनेकांच्या हाती भगवे झेंडे व मागण्यांचे तसेच निषेधांचे व इशारा देणारे फलक होते.

‘एक आदीवासी- लाख आदिवासी, एक कोळी-लाख कोळी, आम्ही मुळ निवासी भारताचे आम्ही आदीवासी, संवीधान आमच्या हक्काचे, हरहर महादेव’ अशा घोषणा देण्यात आल्या. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यावर तेथे जाहिर सभेत रुपांतर झाले.

 

टॅग्स :Morchaमोर्चाkolhapurकोल्हापूर