उचगावात साथीच्या आजारांचे थैमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:29 IST2021-06-09T04:29:34+5:302021-06-09T04:29:34+5:30
उचगाव : उंचगाव (ता. करवीर) येथे कोरोनाने थैमान घातले असून त्यात भरीसभर म्हणून चिकुन गुनिया व डेंग्यूसदृश आजाराने डोके ...

उचगावात साथीच्या आजारांचे थैमान
उचगाव : उंचगाव (ता. करवीर) येथे कोरोनाने थैमान घातले असून त्यात भरीसभर म्हणून चिकुन गुनिया व डेंग्यूसदृश आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे नागरिकांच्या डेंग्यू, चिकुन गुनियाच्या तपासण्या करून ही साथ आटोक्यात आणावी, अशी मागणी करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. डी. नलवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की,
उचगावमध्ये डेंग्यूसह चिकुन गुनिया आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. प्रियदर्शनी कॉलनी, मंगेश्वर कॉलनी, रेडेकर गल्ली, मणेर मळा व संपूर्ण गावात कमी-अधिक प्रमाणात ही साथ पसरली आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गावाचा सर्व्हे करून नागरिकांच्या आरोग्यविषयक तपासण्या करण्याची मोहीम हाती घ्यावी.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नलवडे यांनी उद्या, बुधवारी जिल्हा आरोग्य टीम गावामध्ये पाठवून साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.
यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपतालुकप्रमुख दीपक पाटील, युवासेना तालुकाप्रमुख संतोष चौगुले, उंचगाव प्रमुख दीपक रेडकर, बाळासाहेब नलवडे, युवासेना उपतालुकाप्रमुख प्रफुल्ल घोरपडे उपस्थित होते.
फोटो : ८ उचगाव निवेदन
उंचगावमध्ये चिकुन गुनिया व डेंग्यू या आजाराची जनतेमध्ये जनजागृती करून साथ आटोक्यात आणावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.