शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

अनोखा उपक्रम; अनाथ मुली, महिलांना मिळणार माहेरचा आनंद, रत्नागिरीत माहेरवाशीण मेळाव्याचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 11:55 IST

हा माहेरवाशीण मेळावा चिखलगाव (ता. दापोली, जि. रत्नागिरी) येथे होणार आहे. हा राज्यातलाच नाही तर देशातील पहिलाच असा अनाथ मुलींचा माहेरवाशिणींचा मेळावा ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

कोल्हापूर : अनाथ मुली, महिला व त्यांची मुले यांना माहेरपण अनुभवता यावे यासाठी चिखलगाव येथील लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट (लोकसाधना) व पुण्यातील सनाथ वेल्फेअर फाउंडेशनतर्फे १३ ते १७ मे दरम्यान माहेर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा माहेरवाशीण मेळावा चिखलगाव (ता. दापोली, जि. रत्नागिरी) येथे होणार आहे. हा राज्यातलाच नाही तर देशातील पहिलाच असा अनाथ मुलींचा माहेरवाशिणींचा मेळावा ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील बालगृहातील (अनाथालयातील) माजी संस्थाश्रयी मुले-मुली अनाथ आणि निराश्रित असल्याने त्यांना १८ वर्षांनंतर 'माहेर' म्हणून कोणतेच हक्काचे ठिकाण नाही. माहेरचा आनंद या मुली कधीच उपभोगू शकत नाही. बालगृहात वाढल्यानंतर संस्थेने एकदा लग्न लावून दिले की या मुली कधीच आपल्या संस्थेच्या प्रांगणात माहेरी आल्यासारखा आनंद घेऊ शकल्या नाहीत.शासकीय नियमांमुळे त्या आपल्या बालगृहात माहेर म्हणून एक दिवसही राहू शकत नाहीत. अठरा वर्षांनंतर त्या त्यांच्या बालगृहातून बाहेर पडल्यानंतर त्यांना कोणतेही हक्काचे, विश्रांतीचे, आश्वस्त करणारे 'माहेर' म्हणून विसावा ठरू शकणारे हक्काचे ठिकाण नाही. अशा अनाथ मुली आणि निराश्रित, एकल पालक असलेल्या, लग्नानंतरचे कुटुंब असूनही कौटुंबिक कलहात एकटे पडलेल्या महिला आज राज्यात खूप आहेत. त्यांनाही चार दिवस का होईना पण सुट्टीला आपल्या माहेरी जावेसे वाटते; पण त्यांच्यासाठी अशी कोणतीच हक्काची अशी जागा नाही. त्यांच्या आयुष्यातील ही एक मोठी पोकळी भरून काढण्यासाठीच हा मेळावा होत आहे.या मेळाव्यात नागपूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, यवतमाळ, पंढरपूर, मुंबई, पुणे अशा सर्व जिल्ह्यातील माजी संस्थाश्रयी विवाहित, अविवाहित, एकल पालक असलेल्या मुली, महिला त्यांची बाळं अशा शंभर ते दीडशे महिला सहभागी होतील असा अंदाज आहे. या माहेरवाशिणींच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल, ट्रस्टच्या 'लोकनिर्माण भवन' वसतिगृहात होणार आहे.मदतीचे आवाहनहा माहेरवाशीण आनंद मेळावा यशस्वीपणे पार पडावा, यासाठी दानशूर व्यक्तींकडून आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता आहे. आपापल्या परीने मेळाव्यासाठी आर्थिक सहकार्य करता येईल तेवढे करावे. संपर्कासाठी सनाथ संस्थेच्या संचालिका गायत्री पाठक- पटवर्धन,पुणे (7776043131), प्रा. डॉ. सुनीलकुमार लवटे, कोल्हापूर (9881250093) यांना संपर्क करू शकता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRatnagiriरत्नागिरी