सखी मंचतर्फे आज ‘ओंजळ फुलांची’चे आयोजन

By Admin | Updated: March 23, 2015 00:44 IST2015-03-23T00:07:42+5:302015-03-23T00:44:02+5:30

सखी मंचच्या संस्थापिका ज्योत्स्ना दर्डा यांचा द्वितीय स्मृतिदिन

Organizing 'Onjal Fulangi' by Sakhi Forum today | सखी मंचतर्फे आज ‘ओंजळ फुलांची’चे आयोजन

सखी मंचतर्फे आज ‘ओंजळ फुलांची’चे आयोजन

कोल्हापूर : लोकमत सखी मंचच्या संस्थापिका आणि लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक स्वर्गीय ज्योत्स्ना दर्डा (भाभी) यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त सखी मंचतर्फे आज, सोमवारी ‘ओंजळ फुलांची’ या कार्यक्रमाचे आयोजन शाहू स्मारक भवन येथे केले आहे. दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमांतर्गत डॉ. रेश्मा पवार या ‘लढा ब्रेस्ट कॅन्सरशी’ या विषयावर सखींना मार्गदर्शन करणार आहेत. दुसऱ्या सत्रात मधुबन निर्मित आणि घनश्याम वेंगुर्लेकर प्रस्तुत भजन संध्या हा कार्यक्रमही होणार आहे. स्वर्गीय ज्योत्स्ना दर्डा यांनी चौदा वर्षांपूवी सखी मंचची स्थापना केली. या काळात सखी मंचच्या माध्यमातून महाराष्ट् आणि गोवा येथे अडीच लाखांपेक्षा अधिक कुंटुबे ‘लोकमत’शी जोडली आहेत. सखी मंचच्या माध्यमातून दर्डा यांनी महिला सशक्तीकरणाचे यशस्वी प्रयत्न केले. महिलांना स्वयंरोजगाराची आणि आत्मविश्वासाची नवी दिशा दिली.
ज्योत्स्ना दर्डा यांनी महिलांसाठी सुरू केलेल्या सखी मंच या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला. दर्डा यांनी केलेल्या कार्याला उजाळा देण्यासाठी त्यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त ‘ओंजळ फुलांची’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमात स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. जनजागृतीसाठी सखींनी गुलाबी रंगाची साडी नेसून यावे, असे आवाहन सखी मंचतर्फे केले आहे. माहितीसाठी लोकमत कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी कोल्हापूर येथे आणि २६४१७०७ /०८ वर संपर्क साधावा.

Web Title: Organizing 'Onjal Fulangi' by Sakhi Forum today