शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

मृतदेह दहनासाठी गॅसदाहिनीचा पर्याय

By admin | Updated: April 19, 2017 01:04 IST

महापालिकेत सादरीकरण : बडोद्याच्या कंपनीचा पुढाकार; खर्चासह प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : मृतदेह दहनावर होणारा खर्च आटोक्यात आणण्यासाठी तसेच त्यातून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेसमोर गॅसदाहिनीचा पर्याय पुढे आला असून, त्याबाबत मंगळवारी बडोद्याच्या अल्फा इक्विपमेंट या कंपनीच्यावतीने सादरीकरण करण्यात आले. महापौर हसिना फरास, स्थायी समिती सभापती डॉ. संदीप नेजदार तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेत हे सादरीकरण करण्यात आले.कोल्हापुरात मृतदेहावर मोफत अंत्यसंस्कार केले जातात. पारंपरिक पद्धतीने लाकूड आणि गोवऱ्या (शेणी) यांच्यामार्फत एका मृतदेहासाठी दहनासाठी महापालिकेला सरासरी १२०० रुपये खर्च येतो. दरवर्षी महापालिकेच्या स्मशानभूमीत एकूण किमान ४५०० मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात; पण हा खर्च वाढत निघाल्याने पर्याय म्हणून गॅस दाहिनीचा पर्याय पुढे आला. त्याबाबत स्थायी समिती सभेत हा प्रस्ताव मंजूर झाला आहे. या अत्याधुनिक दाहिनीमुळे खर्चात कपात, प्रदूषण रोखण्यासही मदत होणार आहे. याशिवाय कोणाच्याही भावनाही दुखावणार नाहीत, अशी ग्वाही बडोद्याच्या अल्फा इक्विपमेंट या कंपनीचे विहंग चव्हाण यांनी सादरीकरणावेळी दिली. कोल्हापूर महापालिका सध्या मृतदेहावर दहनासाठी करत असलेला खर्च तसेच कंपनीच्या गॅसदाहिनीमुळे मृतदेहावर दहनावेळी होणारा खर्च, प्रदूषणमुक्तीबाबत पॉवर पॉर्इंटद्वारे सादरीकरण केले. सादरीकरणावेळी उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे, परिवहन समिती सभापती नियाज खान, महिला बालकल्याण समिती सभापती वहिदा सौदागर, सभागृह नेते प्रवीण केसरकर, राष्ट्रवादीचे गटनेते सुनील पाटील, नगरसेवक राहुल चव्हाण, सचिन पाटील, माजी नगरसेवक आदिल फरास, सचिन चव्हाण, राहुल चव्हाण, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, स्मशानभूमी अधीक्षक अरविंद कांबळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)एक गॅसदाहिनी मोफतचव्हाण हे मूळचे कोल्हापूरचे रहिवासी असल्याने त्यांनी सामाजिक बांधीलकी म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेस एक मोफत गॅसदाहिनी देण्याचेही या सादरीकरणावेळी मान्य केले आहे, पण या दाहिनीसाठी लागणाऱ्या गॅस खर्चाची जबाबदारी ही महापालिकेने उचलावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.अल्फा इक्विपमेंट ही बडोदास्थित कंपनी असून गेली ३५ वर्षे डिझेल, गॅस, विद्युतदाहिनीचे प्रकल्प राबविते.या कंपनीचे गुजरात येथे अनेक प्रकल्प कार्यरत आहेत. एका दाहिनीला सुमारे ३५ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.अशी असेल गॅसदाहिनीप्रचलित पद्धतीपेक्षा अतिशय कमी खर्च गॅसदाहिनीमध्ये मृतदेह दहनावर येतो.एक मृतदेह दहनासाठी किमान २५ किलो गॅस व व १० एच.पी. वीज खर्च होते, तर दिवसभरात ३ मृतदेह दहन केल्यास प्रत्येकी किमान ११ किलो गॅस खर्च होतो.त्यापेक्षा जादा मृतदेहावर एका दिवसात दहन केल्यास त्याचा खर्च आणखी कमी होईल.या गॅसदाहिनीमध्ये ५० फूट उंच चिमणी असल्यामुळे त्यापासून निघणाऱ्या धुराचा त्रास होणार नाही, त्यामुळे प्रदूषणमुक्तीसह हातभार लागणार आहे. मृतदेह दहनानंतर दोन तासांत दाहिनी आॅटोमॅटिक बंद होणार आहे.खर्चात ५० टक्के कपात :कोल्हापुरातील लोकांच्या भावना लक्षात घेता कंपनीने लाकडावर आधारित दाहिनीही तयार केल्याचे चव्हाण यांनी सांगितले. त्यामध्ये प्रचलित पद्धतीपेक्षा ५० टक्के खर्च कमी येत असल्याचेही त्यांनी सांगितले.बायोगॅसही वापरता येईलरिंगरोडवर बोंद्रेनगर येथे महापलिकेच्यावतीने कचऱ्यापासून निर्माण होणारा बायोगॅस प्लँट आहे. हा बायोगॅस या योजनेसाठी वापरता येईल, असे सांगितले.