शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
2
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
3
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
4
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
5
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
6
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
7
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
8
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
9
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
10
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
11
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
12
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
13
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
14
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
15
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
16
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
17
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
18
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
19
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
20
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!

Kolhapur: कर्णकर्कश आवाजावेळी चिडीचूप.. अंबाबाईच्या मंजूळ स्तोत्राचा मात्र त्रास

By भारत चव्हाण | Updated: July 22, 2025 12:06 IST

ध्वनियंत्रणेला विरोध : पावणेतीन कोटी खर्चून १२० खांब उभारले

भारत चव्हाणकोल्हापूर : एकीकडे मोठ्या साउंड सिस्टममुळे कानठळ्या बसविणारा आवाज सोडला जात असताना मिरवणुकीतील संयोजकांविरुद्ध तक्रारीचा ‘ब्र’सुद्धा न काढणाऱ्या शहरवासीयांना अंबाबाई मंदिर परिसरात सकाळी आणि संध्याकाळी उमटणाऱ्या मंजूळ स्वरांचा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या ध्वनियुक्त हेरिटेज खांबांची अवस्था ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ अशी झाली आहे.करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी प्रत्येकवर्षी लाखो भाविक येत असतात, या भाविकांचे मंदिराच्या परिसरात आगमन होताच मन प्रसन्न व्हावे, त्यांच्या कानावर देवीच्या स्तोत्राचे मंजूळ स्वर पडावेत. त्यांना आध्यात्मिक समाधान लाभावे, म्हणून मंदिर परिसरात ध्वनियंत्रणा उभारली आहे. ध्वनियुक्त खांबांसाठी २ कोटी ६५ लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मंदिर परिसरातील दोनशे ते तीनशे मीटर परिसरात देवीचे स्तोत्र, आरती, भक्तिगीते भाविकांना ऐकायला मिळतील, अशा पद्धतीने १२० खांब उभे केले आहेत;परंतु हेच खांब मंदिर परिसरातील व्यापारी, विक्रेते, तसेच काही नागरिकांना त्रासदायक ठरत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. लग्नाची वरात असो, शिवजयंतीची मिरवणूक असो, की गणेशोत्सवातील मिरवणुका असोत, त्यात वाजणाऱ्या मोठ्या आवाजाच्या साउंड सिस्टमचा कोणाला त्रास होत नाही आणि झाला तरी कोणी तक्रार करीत नाही. सर्व जण ते मुकाट्याने सहन करतात; परंतु मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या ध्वनियुक्त खांबाचा त्रास होऊ लागल्याने देवस्थान समितीकडे अनेक तक्रारी येत असल्याचे समिती कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.महाद्वार रोडवरील व्यापारी, मंदिर परिसरातील विक्रेते यांच्याकडून या ध्वनियुक्त खांबावर लावल्या जाणाऱ्या भक्तिगीतांच्या आवाजाबाबत तक्रारी होत आहेत. रोज होणाऱ्या तक्रारीमुळे मध्यंतरी काही दिवस ही यंत्रणा बंद ठेवली होती. त्यानंतर ती पुन्हा सुरू करण्यात आली; परंतु आवाज एकदम कमी करण्यात आला आहे. देवीचे स्तोत्र आणि गणपतीची गाणी लावण्याने त्रास होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मंदिर परिसरात आवाज मंजूळ असावा. तो कर्णकर्कश असू नये, अशी आमची अपेक्षा आहे. व्यापारी, विक्रेत्यांना त्रास होत असल्याने त्यांच्या वतीने मी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे तक्रार केली आहे. आवाज मंजूळ असावा, सकाळी ०६:०० ते ११:०० व सायंकाळी ०६:०० ते ०९:००, अशा विशिष्ट वेळेत स्तोत्र लावले जावे. शाळेच्या आणि कामाच्या वेळेत ध्वनियंत्रणा बंद ठेवावी. - श्याम जोशी, महाद्वार रोड व्यापारी 

मंदिर परिसरातील ध्वनियंत्रणेचा त्रास होत असल्याच्या रोज तक्रारी येत आहेत. ध्वनियंत्रणा बंद करा इथपासून खांब काढून टाका, अशाही सूचना फोनवर केल्या जात आहेत. आम्ही मर्यादित आवाजात ही ध्वनियंत्रणा सुरू ठेवली असून, त्यावर देवीचे स्त्रोत्र, तसेच काही गाणी लावतो. - अभिजीत पाटील, यंत्रणा हाताळणारे मंदिर कर्मचारी