शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोधच, ग्रामपंचायतींनी ठराव पाठविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 19:15 IST

प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण

कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीतील पुढचा टप्पा पार पडला असून, कोल्हापूरशेजारील आठ ग्रामपंचायतींनी हद्दवाढीला विरोध केला आहे. तशी पत्रे करवीर पंचायत समितीच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा परिषदेला दाखल करण्यात आली आहेत. ही सर्व गोपनीय पत्रे देण्यात आली असली तरी त्यातून या आठही ग्रामपंचायतींनी कोल्हापूर शहरात समाविष्ट होण्यास विरोध दर्शवला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तांना हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करण्याचे पत्र दिले होते. त्यानुसार महापालिकेने कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून आठ गावांचा अहवाल पाठवण्याबाबत सूचित केले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत कार्यवाही होऊन करवीर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून या गावांना हद्दवाढीबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे पत्र पाठवण्यात आले होते.यानंतर उचगाव, पाचगाव, सरनोबतवाडी, मोरेवाडी, कळंबा, नवे बालिंगा, नवे पाडळी, नवी उजळाईवाडी या गावांनी ठाम भूमिका घेऊन आपली भूमिका ठरावाद्वारे करवीर पंचायत समितीकडे कळवली. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी आपले पत्र जोडून ही पत्रे शुक्रवारी जिल्हा परिषदेकडे पाठवली आहेत. या आठही गावांची भूमिका मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पुन्हा महापालिकेला पाठवण्यात येणार असून, हद्दवाढ प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा यातून पूर्ण होणार आहे.