शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
3
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
4
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
5
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
6
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
7
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
8
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
9
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
10
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
11
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
12
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
13
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
14
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
15
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
16
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
17
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
18
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
19
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
20
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘ए. वाय.’ यांना बिद्रीत नेतृत्व करण्याची विरोधकांची ऑफर; सत्तारुढ गटाला भगदाड पाडण्याची रणनीती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 14:02 IST

मंडलिक, आबीटकर, समरजीत घाटगेंच्या हालचाली गतिमान

कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यांत सत्तारुढ गटाला भगदाड पाडण्याची रणनीती खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबीटकर व ‘शाहू’कारखान्याचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी आखली आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे खंदे समर्थक व ‘बिद्री’च्या राजकारणावर पकड असलेले ए. वाय. पाटील यांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विरोधी पॅनेलचे नेतृत्वच ‘ए. वाय. ’यांनी करावे, अशी खुली ऑफर दिल्याची चर्चा ‘बिद्री’ परिसरात सुरू आहे.‘बिद्री’ कारखान्याचे बिगुल येत्या दोन-तीन दिवसांत वाजणार आहे. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्याने थेट उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु हाेणार असल्याने सत्तारुढ व विराेधी आघाडीने जोरदार तयारी केली आहे. मागील पाच वर्षातील सत्तारुढ गटाचा व प्रशासकीय काळातील कामाचा लेखाजोखा मांडत विरोधकांनी ‘बिद्री’त प्रशासक काळच ‘लै भारी’ असा टोला लगावला. तर जिल्ह्यातील कारखान्यांची तुलना करत ‘बिद्री’त ‘के. पी.’च लै भारी असा पलटवार केल्याने निवडणूकीत जोरदार संघर्ष पहावयास मिळणार आहे. राज्यातील बदलेल्या समीकरणाचे पडसाद ‘बिद्री’ त उमटणार आहेत. मागील निवडणूकीत के. पी. पाटील यांनी भाजप व जनता दलाला सोबत घेत विजयी सोपा केला होता. आता भाजप विरोधात जाणार असून त्यांची खासदार संजय मंडलिक व आमदार प्रकाश आबीटकर यांच्याशी चर्चा सुरू आहे. सत्तारुढ गटातील बड्या नेत्यांवर त्यांची नजर असून राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये काहीसे अस्वस्थ असलेले ए. वाय. पाटील यांना गळाला लावण्याचा प्रयत्न आहे. संजय मंडलिक, समरजीत घाटगे व ए. वाय. पाटील यांच्यात बैठक झाली असून यामध्ये त्यांना विरोधी पॅनेलच्या नेतृत्वाची ऑफर दिल्याचे समजते. ‘ए. वाय.’नी विरोधकांशी हातमिळवणी केली तर निवडणूकीत सत्तारुढ गटाची दमछाक होणार हे निश्चित आहे.

काहीच मिळत नसेल तर ‘रिस्क’ घ्याराष्ट्रवादी कॉग्रेसने ए. वाय. पाटील यांना आश्वासनापलिकडे काहीच दिलेले नाही. २५-३० वर्षे ‘बिद्री’सह सर्वच राजकारणात मंत्री हसन मुश्रीफ व के. पी. पाटील यांच्यासोबत राहून मिळण्यापेक्षा खच्चीकरणच झाल्याची भावना झापेवाडी (ता. राधानगरी) येथे झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. काहीच मिळत नसेल तर ‘रिस्क’ घ्या ,असा दबाव कार्यकर्त्यांचा पाटील यांच्यावर आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेPoliticsराजकारण