शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

उद्यमनगरसह राजारामपुरीतील देखावे पाहण्यास खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 15:29 IST

संततधार पाऊस आणि महापुराच्या दणक्यामुळे यंदा गणेशोत्सव मंडळांनी साधेपणाने सण साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही आबालवृद्धांचे मनोरंजन व्हावे, या उद्देशाने राजारामपुरीसह उद्यमनगर, आदी ठिकाणी देखाव्यांसह आकर्षक गणेशमूर्ती पाहण्यास खुल्या झाल्या आहेत. पावसानेही  उसंत दिल्याने अनेक गणेशभक्तांनी ते पाहण्यासाठी काही प्रमाणात गर्दी केली होती.

ठळक मुद्देपावसाने दिलासा दिल्याने काही प्रमाणात लोक रस्त्यावरखाऊ गल्लीत गर्दी

कोल्हापूर : संततधार पाऊस आणि महापुराच्या दणक्यामुळे यंदा गणेशोत्सव मंडळांनी साधेपणाने सण साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही आबालवृद्धांचे मनोरंजन व्हावे, या उद्देशाने राजारामपुरीसह उद्यमनगर, आदी ठिकाणी देखाव्यांसह आकर्षक गणेशमूर्ती पाहण्यास खुल्या झाल्या आहेत. पावसानेही  उसंत दिल्याने अनेक गणेशभक्तांनी ते पाहण्यासाठी काही प्रमाणात गर्दी केली होती.राजारामपुरी सहावी गल्ली येथील राजारामपुरी जय शिवराय तरुण मंडळाने ११ फुटी वीर हनुमानाचा तांत्रिक देखावा साकारला आहे, तर तांत्रिक देखाव्यांची परंपरा लाभलेल्या शिवाजी उद्यमनगर येथील जय शिवराय मित्र मंडळाने यंदा महापुरात उत्कृष्ट कार्य करून अनेकांचे जीव वाचविणाऱ्या एनडीआरएफ जवान असलेला गणेश व देखावा सादर केला आहे.राजारामपुरी दुसरी गल्ली येथील शिवाजी तरुण मंडळाने यंदा काल्पनिक मंदिर, तर राजारामपुरी स्पोर्टसनेही शिवानंद मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. यासह विवेकानंद मित्र मंडळानेही काल्पनिक मंदिराची प्रतिकृती साकारली आहे.

शिवाजी चौकातील महागणपती व संयुक्त शिवाजी चौकाचा राजा आणि जुना बुधवार पेठ येथील भगतसिंग तरुण मंडळाचा २१ फुटी गणराया, एस. पी. बॉईजचा चिंतामणी गणराया पाहण्यासाठी खुले झाले आहेत. त्यात पावसानेही उसंत दिल्याने रविवारी सायंकाळी या परिसरात काहीअंशी गर्दी झाली होती. राजारामपुरी, खासबाग, रंकाळा तलाव, चौपाटी, शाहूपुरी, आदी परिसरातील खाऊ गल्लीतही सायंकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. 

 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवkolhapurकोल्हापूर