शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

चांदोली धरणाचे दरवाजे आज उघडणार

By admin | Updated: July 30, 2014 00:32 IST

पुन्हा अतिवृष्टी : नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

शिराळा/वारणावती : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून, गेल्या २४ तासांत १३४ मि.मी. पाऊस झाल्याने येथे अतिवृष्टीची नोंद झाली आहे. उद्या, बुधवारी धरणातून अडीच हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. गेल्या दहा दिवसांत येथे वारंवार अतिवृष्टी होत आहे. दोन दिवसांपूर्वी पावसाने थोडी उघडीप दिली होती; मात्र काल, सोमवारपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीतही वेगाने वाढ होत आहे. धरण सध्या ८५ टक्के भरले असून, सांडवा पातळी ओलांडली आहे. उद्या दुपारी तीन वाजता पाणीपूजन करून धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. २५ सेंटीमीटरने हे दरवाजे उघडले जाणार असून, अडीच हजारांचा विसर्ग असेल, अशी माहिती पाटबंधारे अधिकाऱ्यांनी दिली. पाणी सोडण्यात येणार असल्याने आता वारणेच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असून, नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. दरम्यान, पावसाचा जोर वाढल्यामुळे परिसरातील नदी-नाले, ओढे तुडुंब भरून वाहात आहेत. वारणा नदीच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झाली आहे. आज दुपारी ४ वाजता धरणाची पाणीपातळी ६२१.५0 मीटर, तर पाणीसाठा ८२३.७५ द.ल.घ.मी. (२९.0८ टीएमसी) इतका होता. वीज निर्मिती केंद्रातून १७५८ क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात होत आहे. (वार्ताहर)