अर्जासोबत फक्त दोघांनाच प्रवेश - वैभव नावडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:24 IST2021-03-31T04:24:52+5:302021-03-31T04:24:52+5:30
कोल्हापूर : ‘गोकुळ’साठी उमेदवारी अर्ज दाखल करताना फक्त दोघांनाच आत प्रवेश दिला जाईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याची काटेकोर अंमलबजावणी केली ...

अर्जासोबत फक्त दोघांनाच प्रवेश - वैभव नावडकर
कोल्हापूर : ‘गोकुळ’साठी उमेदवारी अर्ज दाखल करताना फक्त दोघांनाच आत प्रवेश दिला जाईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.
‘गोकुळ’ची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया करवीर प्रांताधिकारी कार्यालयात सुरू आहे. तीन दिवसांच्या सुट्टीनंतर मंगळवारी अर्ज दाखल करण्यासाठी तोबा गर्दी झाली होती. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. त्याची दखल निवडणूक यंत्रणेने घेतली आहे. याबाबत, निवडणूक निर्णय अधिकारी नावडकर म्हणाले, कोरोनाचे वातावरण गंभीर आहे, अशा परिस्थितीत गर्दी टाळणेच योग्य आहे. त्यात अर्ज दाखल करायला येणारेे बहुतांशी ज्येष्ठ मंडळी आहेत. त्यामुळे प्रत्येकानेच सावधगिरी बाळगली पाहिजे. निष्कारण कोणी गर्दी करू नये.
आज, बुधवारपासून गर्दी होणार नाही, यासाठी कडक निर्बंध घातले आहेत. उमेदवारी अर्जासोबत फक्त दोनच व्यक्तींना कार्यालयात प्रवेश दिला जाणार असल्याचे वैभव नावडकर यांनी सांगितले.