शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

..तरच मराठा आरक्षण मिळू शकेल, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी व्यक्त केलं स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 13:48 IST

मुंबईत नव्हे दिल्लीत बैठका घ्या

पोपट पवारकोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी सध्या राज्यकर्ते महाराष्ट्रात बैठका घेत आहेत. मात्र, आरक्षणासाठी ५० टक्क्यांची मर्यादा असून ती वाढवण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी या आरक्षणासाठी मुंबईत बैठका न घेता त्या दिल्लीत घेऊन ५० टक्क्यांची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्राला भाग पाडावे, तरच मराठा आरक्षण मिळू शकेल असे मत माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते, आमदार अशोक चव्हाण यांनी गुरुवारी व्यक्त केले.कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या आमदार चव्हाण यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले,  देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार केंद्राने पारित केला. त्यावेळी महाविकास आघाडीच्या सर्वच खासदारांनी पहिल्यांदा आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्याची मागणी केंद्राकडे लावून धरली, मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, हे आरक्षण न्यायालयात टिकले नाही.  मुळात आरक्षणाचा विषय केंद्राच्या अखत्यारित आहे. यात राज्य सरकार काहीच करू शकत नाही. त्यामुळे राज्यकर्त्यांनी मुंबईऐवजी दिल्लीत बैठक घेऊन पंतप्रधानांसह इतर संबधितांची भेट घ्यायला हवी.

काका-पुतण्यांच्या भेटीमुळे संभ्रमराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुप्त भेटीमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यानी हा संशयकल्लोळ दूर करून त्यावर स्पष्टीकरण द्यायला हवे अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली. 

..म्हणे ४२ हजार कोटींच्या पुरवणी मागण्याराज्य सरकारने अधिवेशनात ४२ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या केल्या आहेत. मात्र, याची खरेच अंमलबजावणी होते का हे पाहायला हवे. या सरकारकडून नुसत्या घोषणांचाच सुकाळ पाहायला मिळतो, असा टोलाही चव्हाण यांनी सरकारला लगावला. 

कोल्हापुरात लाेकसभेची एक जागा काँग्रेसला हवीकोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत. या दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवत आहे. मात्र, येणाऱ्या निवडणुकीत यातील एक कॉग्रेसने लढवायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यासाठी मी वरिष्ठ पातळीवरही बोलायला तयार असल्याचे आ.चव्हाण यांनी सांगितले. 

हे तर झेंडावंदन मंत्रीअनेक जिल्ह्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत, कोल्हापूर महापालिकेत अडीच महिन्यांपासून आयुक्त नाही. अनेक जिल्ह्यांना पालकमंत्री नाहीत. जे आहेत ते केवळ झेंडावंदन मंत्री आहेत, या शब्दांत चव्हाण यांनी राज्य सरकारच्या संथगती कारभाराचा समाचार घेतला.

समर्थन नाही अन कृतीही नाहीवादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या संभाजी भिडेंचे आम्ही समर्थन करत नसल्याचा दावा भाजपचे नेते करतात. मात्र, ते त्यांच्यावर कारवाईही करत नाहीत, असा आरोप करत राज्य सरकाने भिडेंना तत्काळ अटक करावी अशी मागणी चव्हाण यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAshok Chavanअशोक चव्हाणMaratha Reservationमराठा आरक्षण