शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

इंडिया आघाडीत फक्त नेत्यांच्या मुलांसह नातेवाईकांना जागा, देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 19:29 IST

'चंदगडचं भलं करायला बावड्याची गरज नाही' 

चंदगड : देशासमोर एक कणखर नेतृत्व म्हणून मोदींच्याकडे पाहिलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला सव्वीस पक्षाची खिचडी आहे. त्या इंडिया आघाडीत फक्त इंजिन आहेत, त्यात फक्त नेत्यांच्या मुलांसह नातेवाईकांना जागा आहे. सामान्य जनतेला त्यामध्ये अजिबात जागा नाही. तुमच्यासाठी जागा फक्त मोदींच्या गाडीमध्ये आहे. आणि ज्या क्षणी तुम्ही संजय मडंलिकांच बटण दाबता त्यावेळी कोल्हापूरच्या विकासाची बोगी या इंजिनला जोडली जाते, मग या मतदारसंघाला विकासापासून कोणीही थांबू शकणार नाही, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. ते इनाम सावर्डे (ता. चंदगड) येथे कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. भाजपचे चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी या मतदारसंघाचा विस्तार, इथली औद्योगिक, पर्यटन विकासासाठीचा सविस्तर आढावा प्रास्ताविकात मांडला. आणि उद्योगमंत्री उदय सामंत आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी एमआयडीसीची मागणी केली. यावर उद्योगमंत्री सामंत यांनी निवडणुकीनंतर लगेच हा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ एमआयडीसी नाही तरी त्यासोबतच मोठे उद्योग या ठिकाणी देऊ, पाटील तुम्ही काळजी करू नका असं सांगितलं. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत,  पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश पाटील,  समरजितसिंह घाटगे, भरमूअण्णा पाटील, हेमंत कोलेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी खासदार विकास महात्मे, संग्राम कुपेकर, अशोक चराटी, अनिता चौगुले, शांताराम पाटील, नामदेव पाटील, संतोष तेली, अनिरुध्द केसरकर यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष राहूल देसाई यांनी आभार मानले. विधानसभेचा कोणताही शब्द मागू नका  पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, सध्या महायुती म्हणून आपण तीनही पक्ष एकत्र आहोत. विधानसभेला पुन्हा आपण एकमेकांसमोर उभे राहणार आहोत. त्यामुळे सध्यातरी उमेदवार मंडलिक यांना पाठिंबा देताना विधानसभेचा कुठलाही शब्द मागून अडचणीत आणू नये. त्यामुळे आता आपण एकत्र काम करून मंडलिक यांना मदत करूया, असं आवाहन केले.चंदगडचं भलं करायला बावड्याची गरज नाही महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज हे डमी उमेदवार असून त्यांचे प्रवक्ते यांच्या हातात त्यांची सर्व सूत्रे आहेत. ते बावड्यात बसून चंदगड तालुका दत्तक घ्यायला निघालेत. त्यामुळे एक दत्तक प्रकरण गाजत असताना चंदगडचं भलं करायला बावड्याच्या लोकांची गरज नसल्याचा टोला आमदार राजेश पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता लगावला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसsanjay mandlikसंजय मंडलिक