कोल्हापुरात केवळ आठ नवे कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:26 IST2021-09-26T04:26:19+5:302021-09-26T04:26:19+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील नवे कोरोना रुग्ण आढळण्याचा वेग खाली आला असून, गेल्या २४ तासांत ...

कोल्हापुरात केवळ आठ नवे कोरोना रुग्ण
कोल्हापूर : जिल्ह्यातील नवे कोरोना रुग्ण आढळण्याचा वेग खाली आला असून, गेल्या २४ तासांत केवळ ३० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तिघांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रातील संख्याही कमालीची घटली असून, नवीन केवळ आठ रुग्ण आढळले आहेत.
आजरा, चंदगड, गगनबावडा, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी या तालुक्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. हातकणंगले आणि करवीर तालुक्यात प्रत्येकी चार, तर शिरोळ आणि इचलकरंजीमध्ये प्रत्येकी तीन रुग्ण आढळले आहेत. भुदरगड, गडहिंग्लज आणि कागल तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.
करवीर तालुक्यातील खुपिरे येथील ७९ वर्षांची महिला, जे.के. नगर इचलकरंजी येथील ६० वर्षीय महिला आणि हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथील ८१ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.