मतमोजणी दिवशी विद्यापीठाचे केवळ आठवे ‘गेट’ खुले

By Admin | Updated: May 14, 2014 00:41 IST2014-05-14T00:41:11+5:302014-05-14T00:41:31+5:30

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी (दि. १६) होणार आहे. त्याबाबत या दिवशी पोलीस प्रशासनाच्या आवाहनानुसार

Only eight 'gate' of the university open on counting day | मतमोजणी दिवशी विद्यापीठाचे केवळ आठवे ‘गेट’ खुले

मतमोजणी दिवशी विद्यापीठाचे केवळ आठवे ‘गेट’ खुले

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी (दि. १६) होणार आहे. त्याबाबत या दिवशी पोलीस प्रशासनाच्या आवाहनानुसार शिवाजी विद्यापीठाचे केवळ गेट क्र. ८ (एन.सी.सी. भवन शेजारील) खुले ठेवण्यात येणार आहे. अन्य प्रवेशद्वारे बंद राहतील, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने पत्रकाद्वारे दिली. शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मतमोजणी होणार आहे. या दिवशी वाहन पार्किंगसाठी विद्यापीठ परिसरातील युको बँकेशेजारील रिकामी जागा आणि दूर शिक्षण केंद्र गेट क्र. ६ जवळील रिकामी जागा वापरण्यात येणार आहे. या दिवशी वाहनांची गर्दी वाढणार असल्यामुळे विद्यापीठाच्या कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी एन.सी.सी. भवनशेजारील गेट क्र. ८ खुले ठेवून अन्य प्रवेशद्वारे बंद ठेवावीत, असे पोलीस प्रशासनाने कळविले आहे. त्यानुसार गुरुवारी (दि. १५) रात्री १० वाजल्यापासून ते मतमोजणी पूर्ण होईपर्यंत शिक्षक, अधिकारी, प्रशासकीय सेवक, विद्यार्र्थी तसेच अन्य घटकांना केवळ गेट क्र. ८ मधूनच ये-जा करता येईल.

Web Title: Only eight 'gate' of the university open on counting day