कोरोनाकाळात ऑनलाईन क्लासने विद्यार्थ्यांना तारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:07 IST2021-02-05T07:07:01+5:302021-02-05T07:07:01+5:30
मोहन सातपुते लोकमत न्युज नेटवर्क उचगाव : कोरोनाकाळात शाळेच्या चारभिंती बंदीतही शिक्षणाची द्वारे खुली झाली. कोरोनाकाळात ऑनलाईन शिक्षणाने ...

कोरोनाकाळात ऑनलाईन क्लासने विद्यार्थ्यांना तारले
मोहन सातपुते
लोकमत न्युज नेटवर्क
उचगाव :
कोरोनाकाळात शाळेच्या चारभिंती बंदीतही शिक्षणाची द्वारे खुली झाली. कोरोनाकाळात ऑनलाईन शिक्षणाने विद्यार्थ्यांना तारले, व्हॉट्स ॲप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व पालकांना स्मार्ट बनवले. शिक्षणाची परिभाषा बदलत आहे.
मोबाईलने पहिलीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्मार्ट बनवलं. ‘ग्रेट भेट’ या उपक्रमामुळे विद्यार्थी धाडसी बनले, निर्भिडपणे ते प्रश्न विचारत आहेत. विद्यार्थ्यांचा सवांद वाढला,फेस टू फेस संवादातून मुलाखत कौशल्य विकसित झाले.
अजूनही काही खेड्यापाड्यांत मोबाईल तंत्रज्ञान अवगत नाही. या विद्यार्थ्यांच्या बाबतीतही कामगार, गोरगरीब झोपडपट्टीतील पालकवर्ग असल्याने प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा विद्यार्थ्यांना ऑनलाईन एज्युकेशन दिलं जात आहे. शिक्षणामध्ये ठेवलेल्या सातत्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढत आहे. दर आठवड्याला होत असलेल्या ऑनलाईन पालकसभेतून पालकांचे शैक्षणिक प्रबोधन होत आहे व याचा फायदा दैनंदिन ऑनलाईन उपस्थितीवर होत आहे.
ऑनलाईन अभ्यास वर्गात शिकविलेल्या घटकांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी रोजच्या रोज करावा यासाठी अध्ययन निष्पत्ती व ज्ञानरचनावादावर आधारित स्वाध्यायपुस्तिका विद्यार्थ्यांना दिल्या. ज्याचा फायदा विद्यार्थ्यांना खूप फायदा झाला विद्यार्थी दिलेला अभ्यास पूर्ण करून दररोज तो व्हाॅट्स ॲपच्या माध्यमातून शेअर करत होते. १ जुलै २०२० पासून आजतागायत ऑनलाईन अभ्यास वर्गाचे ४० मिनिटांच्या सेशनचे २ तास होत राहिले. ही आनंददायी व प्रभावी शिक्षणाची सुरुवात झाली तसेच प्रत्येक रविवारी ‘संडे इज फंडे’ नावाच्या उपक्रमाने कला कार्यानुभव, कविता पाठांतर, पाढे पाठांतर, वक्तृत्व स्पर्धा अशा स्पर्धा घेतल्या. त्यामुळे स्वनिर्मितीचा आनंद विद्यार्थ्यांना मिळाला व ९५ टक्क्यांच्यावर विद्यार्थी ऑनलाईन अभ्यासवर्गाला उपस्थित राहायला लागले.
गणित, इंग्रजी, मराठी, परिसर अभ्यास गुगल क्लास रूमच्या मदतीने १०० गुणांची विकली टेस्टनिर्मिती केली व विद्यार्थ्यांना ती व्हाॅट्स ॲपवर शेअर केली. त्यात ९० गुणांच्या वर गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ई मेल आयडी वर सर्टिफिकेट पाठवायला सुरुवात केली. हे पाहून विद्यार्थ्यांना खूप आनंद मिळायला लागला. विद्यार्थ्यांचे इंग्रजी शब्दभंडार वाढावे यासाठी लीप फॉरवर्ड आयोजित कौन बनेगा वोकॅब मास्टर हा ६० दिवसांचा उपक्रम राबविला. त्यामध्ये विद्यार्थ्यांना दररोज एक व्हिडिओ शेअर केला व रविवारी त्यांना त्यावर टेस्ट दिली जात होती. यामुळे विद्यार्थ्यांचा इंग्रजी शब्दसाठा वाढू लागला. आता विद्यार्थ्यांची संख्या वाढली. पालकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे काम करण्यास अधिकाधिक प्रेरणा मिळत गेली. वर्गाची गुणवत्ता वाढत असल्याने गेल्या अडीच वर्षांत राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे या वर्गाच्या पटसंख्येत तब्बल २२ ने वाढ झाली आहे, यामुळे एकूण पटसंख्या ४० झाली आहे तसेच कोरोनाकाळातसुद्धा वर्गात ५ विद्यार्थ्यांनी नवीन प्रवेश घेतला आहे. अडीच वर्षांमध्ये आलेल्या नवीन आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी माध्यमातून जवळपास ८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे ही या वर्गाची उल्लेखनीय बाब आहे.
ग्रेट भेट या उपक्रमाअंतर्गत ऑनलाईन अभ्यास वर्गात अनेक मान्यवरांनी भेटी
दिल्या यामध्ये जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, शिक्षण विस्तार अधिकारी डी. सी. कुंभार शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती करवीर विश्वास सुतार , गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती करवीर एस. के. यादव, उपसभापती सुनील पोवार, मोहन सातपुते , ग्रा. पं. सदस्य सचिन देशमुख या मान्यवरांच्या ‘ग्रेट भेटी’मुळे विद्यार्थी धाडसी, निर्भिडपणे प्रश्न विचारत आहेत तसेच विद्यार्थ्यांचे संवाद व मुलाखत कौशल्य विकसित होत आहे.
मला तंत्रज्ञानाच्या मदतीने कोरोना महामारीतसुद्धा चांगले अध्यापन करता आले व विद्यार्थ्यांना प्रभावीपणे शिक्षण देता आले. प्रभावीपणे राबवलेल्या या विविध उपक्रमाचा आनंद वाटतो. विद्यार्थ्यांना, पालकांना नवीन शिकायला मिळाले.
रवींद्र मनोहर केदार
अध्यापक, विद्यामंदिर यादववाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर
फोटो ओळ: ऑनलाईन अभ्यासक्रमात यादववाडी शाळेचे शिक्षक रवींद्र केदार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना.
2 : ‘ग्लोबल टीचर ॲवार्ड’चे शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजी यांचे अभिनंदन करताना रवींद्र केदार.