शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

निर्यातबंदीविरोधात मंगळवारी कांदा मार्केट बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 15:12 IST

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले असून, या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मंगळवारी (दि. १५) कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील कांदा मार्केट बंद ठेवणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अजित नरंदे व संजय कोले यांनी  पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देनिर्यातबंदीविरोधात मंगळवारी कांदा मार्केट बंदबंदमध्ये सगळे व्यापारी आणि शेतकरी सहभागी होणार

कोल्हापूर : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले असून, या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मंगळवारी (दि. १५) कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील कांदा मार्केट बंद ठेवणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अजित नरंदे व संजय कोले यांनी  पत्रकार परिषदेत दिली.मागील तीन वर्षे कांद्याचे अधिक अधिक उत्पादनामुळे दर पडले. यंदा सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यात कांद्याचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना चार पैसे मिळण्याची संधी प्राप्त झाली होती. तथापि सरकारने कांद्याची निर्यात रोखण्याचा निर्णय घेतला.

केवळ निर्यातबंदी करून सरकार थांबले नाही तर देशांतर्गत कांदा व्यापारावर साठा मर्यादा घातली. घाऊक व्यापाऱ्यांना केवळ ५० टन, तर किरकोळ व्यापाऱ्यांना १० टन साठा मर्यादा घातली आहे. बांगलादेशात चाललेल्या कांद्याचे ट्रक सात दिवस रोखून धरले.

या निर्णयाने शेतकरी व व्यापारी उद्ध्वस्त होणार आहेत. अगोदरच गेली तीन-चार वर्षे कमी दरामुळे कांदा उत्पादक अडचणीत आला आहे. कांद्याचे दर थोडे वाढले की लगेच ओरड सुरू होते आणि सरकारही तातडीने दर कमी करण्यासाठी हवे ते निर्णय घेते.

सरकारबरोबरच विरोधी पक्षांनी कांद्याचा मुद्दा राजकारणासाठी वापरला जाऊ नये, असे नरंदे व कोले यांनी सांगितले. मंगळवारच्या मार्केट बंदमध्ये सगळे व्यापारी आणि शेतकरी सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मुसा देसाई, आदम मुजावर, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :onionकांदाkolhapurकोल्हापूरMarketबाजार