पोलीसात तक्रार दिली म्हणून एकाला काठीने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:25 IST2021-04-01T04:25:28+5:302021-04-01T04:25:28+5:30

कोल्हापूर : आपल्यातील वादाची तक्रार पोलीस ठाण्यात का दिलीस? या रागातून दोघा भावांनी एकाला काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण ...

One was beaten with a stick as he lodged a complaint with the police | पोलीसात तक्रार दिली म्हणून एकाला काठीने मारहाण

पोलीसात तक्रार दिली म्हणून एकाला काठीने मारहाण

कोल्हापूर : आपल्यातील वादाची तक्रार पोलीस ठाण्यात का दिलीस? या रागातून दोघा भावांनी एकाला काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल झाला आहे. राजू मारुती पातळे (वय ३८, रा. पाचगाव, ता. करवीर) असे जखमीचे नाव असून, ही घटना पाचगावमधील योगेश्वरी कॉलनीत घडली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजू पातळे व अनिल गुंडू कदम, अरुण गंडू कदम हे एकमेकांच्या शेजारी राहतात. काही दिवसांपूर्वी पातळे व कदम यांच्यात वादावादी झाली होती. त्याची तक्रार पातळे याने करवीर पोलिसात दिली होती. त्यावेळी कदम बंधूंवर गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे याचा राग कदम बंधूंच्या मनात होता. या रागातूनच त्यांनी राजू पातळे याला पुन्हा लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली तसेच बघून घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी या दोघांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: One was beaten with a stick as he lodged a complaint with the police