बेळगावात विष पितानाचा व्हिडीओ काढत एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 21:03 IST2018-11-14T21:03:27+5:302018-11-14T21:03:44+5:30

बेळगाव : प्रेयसीच्या कुटुंबियांच्या त्रासाला कंटाळून बैलहोंगल तालुक्यातील कोर्विनकोप्प येथील एका युवकाने विष पितानाचा व्हिडीओ काढत आत्महत्या केल्याची घटना ...

One of the suicides by taking poisoning video of Belgaum | बेळगावात विष पितानाचा व्हिडीओ काढत एकाची आत्महत्या

बेळगावात विष पितानाचा व्हिडीओ काढत एकाची आत्महत्या


बेळगाव : प्रेयसीच्या कुटुंबियांच्या त्रासाला कंटाळून बैलहोंगल तालुक्यातील कोर्विनकोप्प येथील एका युवकाने विष पितानाचा व्हिडीओ काढत आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली.
मंजुनाथ येणगी ( वय २६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
गावातीलच एक मुलीवर त्याचे प्रेम होते. याची माहिती त्याच्या प्रेयसीच्या घरी कळल्यापासून त्यांनी मंजुनाथ याला नाहक त्रास देत त्याच्याकडे १० लाख रुपयांची मागणी केली होती. यापैकी ७ लाख रुपये त्याने दिले होते. पण उरलेले पैसे देण्यास तो असमर्थ ठरला होता. त्यातच प्रेससीच्या कुटुंबियांचा त्रास वाढल्याने मंजुनाथने आत्महत्येचा मार्ग निवडला आहे. याप्रकरणी बैलहोंगल पोलीस स्थानकात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: One of the suicides by taking poisoning video of Belgaum