शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

ताटात रस्सा सांडल्याच्या कारणावरुन चाकूहल्ला, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू; तिघांवर खुनाचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 12:38 IST

औरवाडमध्ये तणावपूर्ण वातावरण असल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

कुरुंदवाड / बुबनाळ : ताटात रस्सा सांडल्याच्या कारणातून वाद होऊन दोघांवर चाकूहल्ला झाल्याची घटना शेडशाळ (ता. शिरोळ) येथे घडली होती. यात दोघे गंभीर जखमी झाले होते. यातील ओंकार माने (रा. औरवाड ता. शिरोळ) याचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी तीघेजण अटकेत असून जखमीचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर औरवाडमध्ये पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.ओंकार शिकलगार, प्रकाश शिकलगार (दोघे रा. शिकलगार वसाहत, कुरुंदवाड, ता. शिरोळ), कुलदीप संकपाळ (रा.शेडशाळ, ता. शिरोळ) या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि.२४) घडली होती.शेडशाळ येथील हॉटेल समाधान ढाबा येथे संशयित आरोपी शिकलगार व संकपाळ हे तिघे व जखमी ओंकार माने व अमीनमहंमद पटेल हे जेवायला बसले असताना एकमेकाला धक्का लागल्याने ताटात रस्सा पडल्याने वाद झाला.या वादावादीचे मारामारीत रुपांतर झाले. यावेळी ओंकार शिकलगार याने खिशातील कटरने पटेलवर वार करून जखमी केले तर सोडवणुकीसाठी आलेल्या ओंकार माने यालाही पाण्याच्या जगने मारहाण करून संशयित तिघांनी लथाबुक्क्याने मारहाण केली होती.यात ओंकार माने व अमीनमहंमद पटेल जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान आज सकाळी ओंकार माने यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण वातावरण असल्याने औरवाड परिसरात पोलीस बंदोबस्त लावला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस